Friendship Day ला काय गिफ्ट द्यावं सुचत नाही, मग 'हे' आहेत बेस्ट गिफ्ट ऑप्शन

ऑगस्ट महिन्याच्या पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो.

Aug 03, 2022, 19:33 PM IST

Friendship Day 2022  - श्रावण सुरु झाला की लगबग सुरु होते ती सणासुदीच्या तयारीची. बहीण-भावाच्या नात्यासोबत एक अजून नातं साजरं केलं जातं ते म्हणजे मैत्रीचं. ऑगस्ट महिन्याच्या पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा या मैत्री दिवस Friendship Day 2022 आहे 7 ऑगस्टला. म्हणजे आता फार कमी दिवस राहिले आहेत. आज असा कोणी व्यक्ती नाही ज्याला एक खास असा मित्र नाही. प्रत्येकांचा आयुष्यात रक्ताच्या नात्यापेक्षा अजून एक नातं म्हणजे मैत्रीचं असतं. सुखदु:खात अगदी कुठल्याही कठीण प्रसंगात आपल्या पाठीशी उभा राहणाऱ्या आपल्या या खास व्यक्तीला Friendship Day 2022निमित्त काही तरी गिफ्ट द्यायला हवं. तर आज आम्ही तुम्हाला काही गिफ्टचे ऑप्शन देणार आहोत. (trending tech friendship day gift ideas 2022 friendship day  in marathi)

1/5

Fire-Bolt Neptune Smartwatch

Fire-Bolt Neptune Smartwatch ही 17,99 रुपयात मार्केटमध्ये मिळते. ही तुमच्या खास व्यक्तीसाठी शानदार गिफ्ट आहे. या स्मार्टवॉचला 1.69-इंचाचा HD डिस्प्ले मिळतो. या स्मार्टवॉचमध्ये 240x280 रिझोल्यूशन, 5ATM वॉटर रेझिस्टंट, 118 स्पोर्ट मोड आणि SpO2 सेन्सर खास फिचर आहेत. 

2/5

JBL Free WFH Headphones

JBL Free WFH हॅडफोन्स आपल्याला मार्केटमध्ये 1,799 रुपयात मिळतात. या हेडफोन्समध्ये एक डेडिकेटेड माइकसुद्धा आहे. शिवाय यात वायरचा ऑप्शन पण देण्यात आलं आहे. तुम्ही JBL Free WFH Headphones लॅपटॉप किंवा फोनशी सहजपणे कनेक्ट करू शकता.

3/5

Mi Smart Band-5

Mi Smart Band-5 यात युजरला अनेक उत्तम फीचर्स मिळतात.  हा स्मार्ट बँड तुम्हाला 1,999 रुपयांना मिळतो. जर तुमच्या मित्राला फिटनेसची आवड असेल, तर हे त्याच्यासाठी एक चांगला फिटनेस ट्रॅकर म्हणून काम करेल. हा स्मार्ट बँड चुंबकीयरित्या चार्ज केला जातो, ज्याची बॅटरी 2 आठवड्यांपर्यंत टिकू शकते.

4/5

Ambrane Power Bank

Ambrane Power Bank 20000 mAh बॅटरीसह मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जी तुम्ही फक्त 1,499 रुपयांना खरेदी करू शकता. या पॉवर बँकेद्वारे तुम्ही तुमचा स्मार्टफोन 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह चार्ज करू शकता. 

5/5

Boat Stone 1000

Boat Stone 1000 स्पीकरची किंमत 1,999 रुपये आहे. यात उत्कृष्ट ब्लूटूथ स्पीकर्स 14W स्टिरिओ साउंडसह  IPX5 वॉटर रेझिस्टंट रेटिंग देखील आहे. हा चार्ज केल्यावर जवळपास 8 तास चालतो.