जगातील Dangerous Spiders! एकदा चावलं की खेळ खल्लास, जाणून घ्या प्रजातींबाबत

World's Most Dangerous Spiders: दक्षिण ध्रुवावर स्थित अंटार्क्टिका खंड वगळता जगभरात कोळी आढळतात. आपण अनेकदा कोळी आणि त्यांचे जाळे पाहतो. बहुतेक कोळी आपल्याला हानी पोहोचवत नाहीत. पण काही कोळी सापासारखे विषारी असतात. विषारी कोळी चावल्याने माणसाचा जीव जाऊ शकतो. चला जाणून घेऊया या धोकादायक आणि प्राणघातक कोळ्यांबद्दल.

Dec 01, 2022, 14:10 PM IST
1/5

most dangerous spiders

ब्राऊन रेक्लुस स्पायडर हा सर्वात धोकादायक कोळी आहे. साधारणपणे हे कोळी अंधरात राहणं पसंत करतात. हे  कोळी अमेरिकेत आढळतात. ब्राऊन रेक्लुस स्पायडरच्या विषामुळे माणूस मरू शकतो.

2/5

most dangerous spiders

ब्लॅक विडो स्पायडर सामान्यतः उत्तर अमेरिका आणि कॅनडामध्ये आढळतात. हा निळ्या रंगाचा आहे. ब्लॅक विडो कोळी विषारी आहे. मादी अधिक धोकादायक मानली जाते. तिचे विष सापासारखं असल्याचं मानलं जातं.

3/5

most dangerous spiders

फनेल वेब स्पायडर सामान्यतः न्यूझीलंड, चिली, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये आढळतात. फनेल वेब स्पायडरमध्ये नर अधिक धोकादायक मानला जातो. फनेल वेब स्पायडर चावल्यास त्वरित उपचार आवश्यक आहेत. अन्यथा मृत्यू होऊ शकतो.

4/5

most dangerous spiders

होबो स्पायडर जगातील सर्वात प्राणघातक कोळी आहे. हा ब्राऊन रेक्लुस स्पायडर दिसतो. होबो स्पायडर चावल्याने सूज येते आणि त्वचा लाल होते. होबो स्पायडर चावल्याने लहान मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

5/5

most dangerous spiders

यलो सॅक स्पायडर चिराकँथिडे प्रजातीतील आहे. हे स्पायडर इतर कोळ्यांपेक्षा माणसांना जास्त चावतात. उत्तर आफ्रिका, अमेरिका आणि भारतासह अनेक देशांमध्ये यलो सॅक स्पायडर आढळतात.