'हे' आहे जगातले सर्वात महागडे घटस्फोट, सेटलमेंटची रक्कम वाचून व्हाल थक्क

Jan 25, 2024, 20:50 PM IST
1/9

14 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटाची घोषणा

Know World Most Expensive Divorces after Shoab Malik-Sania Mirza divorce

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक हे दोघेही वेगळे झाले आहेत. त्या दोघांचा 'खुला' झाला आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी 14 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटाची घोषणा केली. 

2/9

शोएब मलिक तिसऱ्यांदा लग्नबंधनात

Know World Most Expensive Divorces after Shoab Malik-Sania Mirza divorce

शोएब मलिकने सानियासोबत घटस्फोट घेतल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नबंधनात अडकला. शोएबने त्याची पहिली पत्नी आऐशाला 15 कोटी रुपये दिले होते.

3/9

शोएबची एकूण संपत्ती 28 मिलियन

Know World Most Expensive Divorces after Shoab Malik-Sania Mirza divorce

शोएब हा पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. शोएबची एकूण संपत्ती 28 मिलियन म्हणजेच 232 कोटी रुपये आहे. पण अद्याप शोएब मलिक हा सानियाला किती रक्कम देणार, ही माहिती समोर आलेली नाही. 

4/9

जगातल्या सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक

Know World Most Expensive Divorces after Shoab Malik-Sania Mirza divorce

जगातले चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी २७ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटाची घोषणा केली. बिल गेट्स यांच्याकडे १३० बिलियन डॉलरची इतकी संपत्ती आहे. बिल गेट्स यांनी मेलिंडा गेट्स यांना 73 अबर डॉलर इतकी रक्कम दिली होती. हा घटस्फोट जगातल्या सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक मानला जातो. 

5/9

Amazon चे संस्थापक जेफ बेजॉस यांचाही यादीत समावेश

Know World Most Expensive Divorces after Shoab Malik-Sania Mirza divorce

Amazon चे संस्थापक जेफ बेजॉस यांनी पत्नी मॅकेंजीला घटस्फोट दिला. या दोघांचा घटस्फोट जगातला सर्वात महागडा घटस्फोट मानला जातो. जेफ यांनी पत्नी मॅकेंजी यांना 38 बिलियन डॉलर इतके रुपये दिले होते.

6/9

घटस्फोटाची सेटलमेंट 3.8 बिलियन डॉलर

Know World Most Expensive Divorces after Shoab Malik-Sania Mirza divorce

फ्रान्स वंशाचे अमेरिकी व्यापारी आणि आर्ट डीलर एलक विलडनस्टीनने लग्नाच्या 24 वर्षानंतर पत्नी जॉसलीन विलडनस्टीनला घटस्फोट दिला होता. या घटस्फोटाची सेटलमेंट 3.8 बिलियन डॉलर म्हणजे 267 अब्ज, 84 लाख कोटी आणि 30 लाख इतके रुपये दिले होते.  

7/9

31 वर्षांचा संसार मोडला

Know World Most Expensive Divorces after Shoab Malik-Sania Mirza divorce

मीडिया मुगल रूपर्ट मर्डोक आणि पत्रकार एना टॉर्ब यांनी 31 वर्षे संसार केला. त्यांना तीन मुलंही झाली. 1998 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. यावेळी 1.7 बिलियन डॉलर म्हणजे 119 अब्ज, 82 कोटी आणि 45 लाखात सेटलमेंट झाली होती.

8/9

एकदा नव्हे तर दोनदा लग्न

Know World Most Expensive Divorces after Shoab Malik-Sania Mirza divorce

लास वेगासमधील मोठे कसिनो व्यापारी स्टीव आणि एलन वीन यांनी एकदा नाही तर दोनदा लग्न केलं. पहिल्यांदा त्यांनी 1963 ते 1986 पर्यंत पती-पत्नी होते. नंतर 1991 ते 2010 पर्यंत होते. दुसऱ्यांदा जेव्हा त्यांचा घटस्फोट झाला तो फार महागडा झाला. एका अंदाजानुसार, यांची सेटलमेंट 1 बिलियन डॉलर म्हणजे आताच्या हिशेबाने 70 अब्ज, 48 कोटी आणि 50 लाखात झाली होती

9/9

बर्नी एकलिस्टन आणि स्वेलिका रेडिएक

Know World Most Expensive Divorces after Shoab Malik-Sania Mirza divorce

यूनायटेड किंगडमच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बर्नी एकलिस्टन आणि क्रोशियाची मॉडल स्वेलिका रेडिएक यांच्यात २००९ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यांची सेटलमेंट कितीत झाली याचे डीटेल्स बाहेर येऊ शकले नाही. मात्र, एका अंदाजानुसार, ही सेटलमेंट १.२ बिलियन डॉलर म्हणजे 84 अब्ज आणि 57 कोटी रूपयात झाली होती.