Weight Gain : झोप कमी झाली की वजन वाढतं? काय सांगतात तज्ज्ञ...

Sleep affect Weight Gain : तुम्ही जिममध्ये जातात आणि डाएटही फ्लो करता तरी तुमचं वजन वाढत आहे. मग तुम्ही कदाचित पुरेशी झोप घेत नाही आहात. झोप कमी झाली की वजन वाढतं, काय यामागील शास्त्र जाणून घ्या. 

Oct 11, 2023, 21:09 PM IST

Sleep affect Weight Gain : तुम्ही जिममध्या जातात आहात आणि डाएटही फ्लो करत आहात तरी तुमचं वजन कमी होण्याऐवजी वाढत आहे. याचा अर्थ तुमचं काही तरी चुकतंय. नेमकं काय चुकतंय याबद्दल आपण बोलणार आहात.

1/9

तुम्ही किती तास झोप घेता याच संबंध तुमच्या वजनाशी आहे. तज्ज्ञाने वयाच्या हिशोबाने आपल्याला किती तासांची झोप हवी आहे याबद्दल सांगितलं आहे. साधारण आपल्याला 8 तासांची झोप आवश्यक आहे.   

2/9

जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला अनेक आजार गाठू शकतात. त्यातच एक समस्या आहे ती म्हणजे कमी झोप झाल्यामुळे तुमचं वजन वाढतं. 

3/9

कमी झोपेमुळे तुमच्या मन:स्थितीवर आणि तुमच्या पचनावर वाईट परिणाम होतात. याचा परिणाम तुमचं वजन वाढतं. 

4/9

तुमची झोप पूर्ण झालेली नसेल तर इन्शुलिन रेझिस्टन्स आणि ग्लुकोज इंटॉलरेंसचा त्रास होतो. याचा अर्थ तुम्हाला मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. (हेसुद्धा वाचा - Sleep Time : तुमचं वय किती ? तुम्हाला किती तास झोप गरजेची जाणून घ्या)

5/9

तुमची रोजची दगदग आणि त्यात कमी झोप अशाने मधुमेहाचा त्रास झाल्यास तुमचं वजन कमी करणं कठीण जातं. 

6/9

झोपेच्या कमतरतेमुळे टाइप 2 मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका अनेक संख्येने वाढतो. त्याशिवाय तुम्हाला स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोकाही असतो.   

7/9

अपुऱ्या झोपेमुळे चयापचय क्रिया मंदावते आणि त्यामुळे तुम्हाला थकवा, आळशीपणा जाणवतो.   

8/9

झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील हार्मोन असंतुलित होतं आणि याचा परिणाम तुमची भूक वाढते. त्यासोबत तुमचं वजन झपाट्याने वाढतं.

9/9

पूर्ण झोप न मिळाल्याने शरीर सुस्त होऊन कॅलरीज कमी बर्न होतात. याचा अर्थ वजन कमी करणे कठीण जाते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)