वेळेत बील भरा म्हणणाऱ्या मंत्र्यांच्या बंगल्यांची लाखोंची थकबाकी; मुख्यमंत्र्यांचेही पाणीदेयक थकीत

सामान्य नागरिकांना वेळेवर वीज किंवा पाणी बील भरायला सांगणाऱ्या सरकारी मंत्र्यांच्या बंगल्यांचीच लाखोंची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे पाण्याचे बील भरले गेले नसल्याचे उघड झालं आहे.  

Apr 05, 2024, 11:27 AM IST
1/7

Ramtek bunglow

सर्व बंगल्यांमध्ये शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या रामटेक बंगल्याची 11 लाख 30 हजार 242 रुपये पाणी दयेक थकबाकी आहे.

2/7

cm eknath shinde

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ व ‘नंदनवन’ या दोन बंगल्यांची पाणी देयक थकबाकी 18 लाख 48 हजार 357 रुपये आहे.

3/7

devendra fadnavis sagar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ व ‘सागर’ या दोन बंगल्यावरील पाणी देयक थकबाकी 2 लाख 73 हजार 118 रुपये आहे.   

4/7

ajit pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यांच्या ‘देवगिरी’ बंगल्याची पाणी थकबाकी चार लाख 38 हजार 859 रुपये आहे. 

5/7

sudhir mungantiwar

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘पर्णकुटी’ बंगल्याची थकबाकी सहा लाख 52 हजार 494 रुपये इतकी आहे. 

6/7

girish mahajan

यासोबत महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयलस्टोन बंगल्याची 92 हजार 423 रुपये, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या चित्रकूट बंगल्याची 5 लाख 19 हजार 140 रुपये, ग्रामविकास तसेच पर्यटन मंत्री गिरीष महाजन 1 लाख 56 हजार 528 रुपये पाणी दयेक थकबाकी आहे

7/7

uday samant

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील 1 लाख 18 हजार 324 रुपये, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बंगल्याची 6 लाख 83 हजार 623 रुपये इतकी थकबाकी आहे.