'ही' प्रसिद्ध अभिनेत्री पुरुषांना घाबरते! स्पर्म डोनरच्या मदतीने मुलाला जन्म देणार

Lala Kent plans sperm donor baby: प्रसिद्ध अभिनेत्रीला पुरूषांची का वाटते भिती? आई होण्यासाठी असा का हट्ट धरलाय?

Dec 04, 2022, 21:14 PM IST

Lala Kent plans sperm donor baby: प्रसिद्ध अभिनेता-अभिनेत्री कितीही चमचमत्या दुनियेत वावरत असल्या तरी,त्यांच्या आयुष्यातही अंधार हा असतोच. त्यांच्या आयुष्यात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. असाच एक धक्कादायक किस्सा एका प्रसिद्ध अभिनेत्रीने (Actress) एका मुलाखतीत सांगितला आहे. हा किस्सा एकूण चाहत्यांच्या अंगावर काटा आला आहे.

1/5

Lala Kent

प्रसिद्ध अमेरिकन सेलिब्रिटी आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार लेले केंटने (Lala Kent) स्पर्म डोनरच्या मदतीने मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे. तिचा आधीचा नवरा एम्मेटपासून विभक्त झाल्यानंतर तिने हा निर्णय घेतला आहे.    

2/5

Lala Kent

व्हेंडरपंप रूल्स स्टारने पॉडकास्ट शेनानिगन्सला दिलेल्या मुलाखतीत लेले केंटने (Lala Kent) सांगितले की, ती पुढील वर्षी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) ऐवजी इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI) निवडून जगात मूल आणू शकते.

3/5

Lala Kent

दरम्यान 32 वर्षीय लेले केंट (Lala Kent) आधीच एका मुलाची आई आहे. त्यानंतर तिने आता पुरुषाकडून नाही तर स्पर्म डोनरच्या मदतीने मुलाला जन्म देणार असल्याची घोषणा केली आहे.  

4/5

Lala Kent

केंट (Lala Kent) म्हणाली की, माझा आधीचा नवरा अविश्वासू होता, त्यामुळे मी पुन्हा कोणत्याही पुरुषासोबत धोका पत्करू शकत नाही. मला एक मुलगी आहे, जिच्यावर मी खूप प्रेम करेन, पण आता नवीन मूल स्पर्म डोनरच्या मदतीने येईल.

5/5

Lala Kent

मूळचे सॉल्ट लेक सिटीचे रहिवासी असलेल्या लेले केंटचे (Lala Kent) सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्याच्या मुलाखतीनंतर नेटिझन्स तिच्या पोस्टला आणखी समर्थन देत आहेत.