Lawrence Bishnoi Love Story : अंगावर काटा आणणारा गर्लफ्रेण्डचा अंत पाहून लॉरेन्स बिष्णोई झाला गँगस्टर; दहावीत असताना भेटली अन्...

Lawrence Bishnoi Girlfriend : सामान्य महाविद्यातील हा विद्यार्थी गँगस्टर बनण्यामागे त्याचा बालपणाच्या गर्लफ्रेंडचा कॉलेजमधील निघृण हत्या...असूया आणि बदल्याच्या भावनेतून त्याने गुन्हेदारीच्या जगात पाऊल ठेवला. 

| Oct 15, 2024, 14:42 PM IST
1/7

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत शनिवारी गोळा झाडून हत्या झाली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स गँगने घेतली आहे. यानंतर लॉरेन्स बिष्णोई पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

2/7

कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याची टोळी एका मागून एक मोठ्या घटना घडवत आहे असा संशय बळावलेला असताना हा लॉरेन्स बिश्नोई गँगस्टर कसा बनला या प्रश्नाच उत्तर गुगलवर शोधण्यात येतं. 

3/7

प्रेयसीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर असूया आणि बदल्याच्या भावनेतून लॉरेन्स हा गँगस्टर बनला असं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येतं. लॉरेन्सची प्रेम कहाणी ही 2008 मध्ये सुरु झाली. त्यावेळी तो दहावीत शिकत होता तेव्हा त्याला एक मुलगी आवडली. 

4/7

काजल असं त्या मुलीचं नाव होतं. शाळेत स्टायलिश राहणाऱ्या लॉरेन्सवर शाळेतील मुली फिदा असायच्या. त्या दोघांची मैत्री झाली, एकमेकांना ते आवडतात हे त्यांना कळलं होतं. या मैत्रीचं रुपातंर प्रेमात झालं. 

5/7

लॉरेन्स बिश्नोई यांचं सुरुवातीचं शिक्षण पंजाबमधील अबोहर येथील कॉन्व्हेंट शाळेत झालं. त्यानंतर तो आपल्या मैत्रिणीसोबत चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेला. कॉलेज संपल्यानंतर लग्न करण्याचा दोघांचा इरादा होता. पण मधेच कुठेतरी काहीतरी घडलं, ज्याने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. 

6/7

 लॉरेन्स बिश्नोईने कॉलेजमध्ये मित्रांची एक टोळी तयार केली होती. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. लॉरेन्स बिश्नोई प्रतिस्पर्धी टोळीकडून निवडणूक हरले. यानंतर दोन्ही टोळ्या समोरासमोर आल्या. प्रतिस्पर्धी टोळीने लॉरेन्सच्या मैत्रिणीला जिवंत जाळल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा केवळ अपघात असल्याचे सांगण्यात आले.  

7/7

बदला घेण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने पंजाब युनिव्हर्सिटीची स्टुडंट ऑर्गनायझेशन (SOPU) नावाची टोळी पूर्णपणे सक्रिय केली. बालपणीचे प्रेम हरवल्याने तो संतापला होता. त्याने रिव्हॉल्व्हर विकत घेतले आणि प्रेयसीच्या हत्येचा आरोप असलेल्या सर्वांवर गोळीबार केला. अखेरीस, अशा प्रकारे लॉरेन्सचा गुन्हेगारीच्या जगात प्रवेश झाला.