close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

क्रिकेटच्या मैदानात नव्हे, 'या‌' खेळाडूची रॅम्पवर दमदार ओपनिंग

मॉडलिंगमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री लीसा हेडनने बुधवारी लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. पण तिचा हा रॅम्प वॉक इतर वॉकपेक्षा काहीसा वेगळा होता. काही दिवसांपूर्वी लीसाने तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची सोशल मीडियावर माहिती दिली. लीसासह क्रिकेटपटू हार्दिक पांड्यानेही रॅम्पवॉक केला. 

Aug 22, 2019, 16:42 PM IST
1/6

लीसाने फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांच्यासाठी रॅम्प वॉक केला. या वॉकसाठी लीसा एका वेगळ्याच अंदाजात रॅप्मवर दिसली.

2/6

लीसा रॅम्पवॉकसाठी हायस्लिट मेटॅलिक ड्रेस घालून उतरली होती.

3/6

लीसाने २०१० मध्ये 'आयेशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करियरची सुरुवात केली. त्यानंतर ती 'शौकीन', 'क्वीन', 'हाउसफुल ३' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

4/6

अमित अग्रवाल यांच्या शोसाठी लीसा-हार्दिक शो स्टॉपर होते. 

5/6

क्रिकेटर हार्दिक पांड्या पहिल्यांदाच रॅम्पवर उतरला होता. हार्दिकनेही मेटॅलिक स्टाईल लूकमध्ये रॅम्पवॉक केला.

6/6

हार्दिकचा भाऊ आणि क्रिकेटर कुणाल पांड्याही रॅम्पवर उतरला.