Lek Ladki Yojna: महाराष्ट्राची लेक लाडकी योजना नेमकी काय आहे? त्यासाठी पात्र कोण ठरतं? फायदा कसा मिळवायचा?

मुलींच्या सक्षमीकरणासाठी 1 एप्रिलपासून ही योजना सुरु कऱण्यात आली. या योजनेत मुलीला 18 वर्षांची होईपर्यंत 1 लाख 1 हजार रुपये मिळतील अशी तरतूद केल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.  

Feb 27, 2024, 19:20 PM IST
1/8

अजित पवार यांनी आज येत्या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेबाबत मोठी घोषणा केली.   

2/8

मुलींच्या सक्षमीकरणासाठी 1 एप्रिलपासून ही योजना सुरु कऱण्यात आली. या योजनेत मुलीला 18 वर्षांची होईपर्यंत 1 लाख 1 हजार रुपये मिळतील अशी तरतूद केल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.  

3/8

विशेष म्हणजे मुलगी जन्माला आल्यापासून ही योजना लागू होते. मुलगी सज्ञान होईपर्यंत ही मदत दिली जाणार.   

4/8

पण ही योजना मुख्यत्वे गरिब कुटुंबातील मुलींसाठी आहे. मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत मुलींना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने योजना सुरु करण्यात आली आहे. मुलीचं वय 18 वर्ष होईपर्यंत सरकारकडून टप्याटप्याने ही मदत दिली जाणार आहे.   

5/8

पण 'लेक लाडकी' योजनेचा लाभ सर्वांना घेता येणार नाही. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींसाठीच ही योजना आहे.   

6/8

या योजनेनुसार जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार. तसंच पहिलीत गेल्यानंतर 6000 रुपये, सहावीत गेल्यानंतर 7000 रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये देण्यात येतील.   

7/8

मुलगी 18 वर्षाची म्हणजे सज्ञान झाल्यानंतर तिला रोख 75 हजार रुपये देण्यात येतील.  

8/8

म्हणजेच मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला या योजनेअंतर्गत एकूण 1 लाख 1 हजार रुपये मिळतील.