Photos: काँग्रेसच्या माजी नेत्यानेच घडवून आणला अशोक चव्हाणांचा 'भाजप' प्रवेश

Maharashtra Politics: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा हात सोडून अशोक चव्हाण यांनी भाजपला साथ दिली आहे. मात्र या सगळ्यामध्ये एका माजी काँग्रेसच्या नेत्याचा समावेश असल्याचे समोर आलं आहे.

Feb 19, 2024, 16:34 PM IST
1/7

ashok chavan join bjp

आठवडाभरापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

2/7

मात्र ही त्यांची खूप जुनी योजना असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काँग्रेसच्या एका माजी नेत्याच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यावर अंतिम मंजुरी देण्यात आली होती.

3/7

ashok chavan

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाण्याचा अनेक दिवसांपासून विचार करत होते. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नेते आशिष कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

4/7

ashish kulkarni politician

आशीष कुलकर्णी हे एकेकाळी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू होते. मात्र, नंतर ते नारायण राणेंसह शिवसेनेपासून दुरावले. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यासाठी रणनीतीकार म्हणून काम केले. काँग्रेसनंतर त्यांनी फडणवीस यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली.

5/7

ashish kulkarni with cm shinde

मात्र, येथेही हे फार काळ टिकले नाहीत आणि राजकीय उंची वाढवण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांच्यासोबतच पक्ष बदलण्याचा विचार करणाऱ्या आमदारांची ओळख पटवणाऱ्यांमध्ये कुलकर्णी यांचाही समावेश होता.

6/7

cm shinde group

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातून 40 आमदार आणण्यात कुलकर्णी यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. जून-जुलै 2022 मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी शिवसेनेपासून फारकत घेतली होती.

7/7

Shinde Group

सर्व आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर शिंदे गटाला कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने मदत करण्याकरिता आशीष कुळकर्णी यांना भाजपच्या वतीने खास गुवाहटीला पाठविण्यात आले होते.