नाच रे मोरा...! मान्सूनचं आगमन होताच पिसारा फुलवून नाचले मोर; पाहा विलोभनीय दृश्य

सांगलीत पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरांचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Jun 10, 2024, 19:57 PM IST

सांगलीत पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरांचा व्हिडीओ समोर आला आहे. 

1/7

राज्यात जोरदार पावसाची हजेरी

Maharashtra Rain Sangli banchappa forest Peacock Dancing photos

राज्यात सर्वत्र मान्सून सक्रीय झाला आहे. मुंबई, पुणे, कोकणासह विदर्भातही पावसाने जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यातही सर्वत्र पावसाच्या सरी कोसळल्या.

2/7

पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराचा व्हिडीओ

Maharashtra Rain Sangli banchappa forest Peacock Dancing photos

सांगलीत पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आता सांगलीत पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरांचा व्हिडीओ समोर आला आहे. 

3/7

पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी टिपले दृश्य

Maharashtra Rain Sangli banchappa forest Peacock Dancing photos

सांगलीच्या पलूस बुर्ली या ठिकाणी असलेल्या बंचाप्पा बनात पिसारा फुलवून थुई थुई नाचणाऱ्या मोरांचा व्हिडीओ पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी चित्रीत केला आहे.  

4/7

पावसाच्या सरी कोसळल्यानंतर नाचू लागले मोर

Maharashtra Rain Sangli banchappa forest Peacock Dancing photos

सांगलीच्या बंचाप्पा बनात पावसाच्या सरी कोसळल्यानंतर पिसारा फुलवून मोर नाचू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

5/7

पाहा मयुरनृत्याची विलोभनीय दृश्य

Maharashtra Rain Sangli banchappa forest Peacock Dancing photos

मोरांचा आवाज आणि मयुरनृत्याची विलोभनीय दृश्य पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी टिपली आहेत.

6/7

Maharashtra Rain Sangli banchappa forest Peacock Dancing photos

यात जंगलात मनसोक्त पिसारा फुलवून नाचताना दिसत आहे. 

7/7

नाच रे मोरा आंब्याच्या वनात

Maharashtra Rain Sangli banchappa forest Peacock Dancing photos

या मोराकडे पाहताना नाच रे मोरा आंब्याच्या वनात हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही.