...अन् 'या' कारणामुळे 'पंचायत' च्या बनराकसनं केलं 'बी ग्रेड' सीरिजमध्ये काम

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक प्रतिभावान  कलाकार आहेत, ज्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र. त्यांना योग्य ती ओळख मिळू शकली नाही. पण असं म्हणतात की मेहनत आणि संघर्ष करायची इच्छा असेल तर एक दिवस फळ नक्कीच मिळतं. अशीच काहीशी गोष्ट 'पंचायत 3'च्या बनराकस उर्फ ​​भूषण शर्मासोबत घडली. आज आपण त्याच्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊया....

| Jun 10, 2024, 18:21 PM IST
1/7

दुर्गेश कुमार

या कलाकाराचं खरं नाव दुर्गेश कुमार आहे, जो बिहारच्या दरभंगाचा रहिवासी आहे. 'पंचायत' या सीरिजमधील 'देख रहा है ना विनोद...' या डायलॉगमधून त्याला वेगळी ओळख मिळाली. 

2/7

संघर्षमय प्रवास

मात्र, त्याचा हा प्रवास काही सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला. अगदी डिप्रेशनसारख्या आजारातून त्याला जावं लागलं. नुकताच दुर्गेश कुमारनं एका मुलाखतीत त्याच्या संघर्षाबद्दल खुलासा केला आणि 'पंचायत'मध्ये त्याला काम कसं मिळाले हे देखील सांगितलं.    

3/7

कशी झाली सुरुवात?

'द लॅलनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत दुर्गेश म्हणाला, 'मी 11 वर्षांत दोनदा डिप्रेशनचा शिकार झालो आहे. जेव्हा मी 2016 मध्ये पहिल्यांदा वर्सोव्याला आलो होतो, तेव्हा मी तिथे काही नवीन मित्र बनवले आणि आम्ही इंडस्ट्रीत आमचे नशीब आजमावायला सुरुवात केली आणि आम्ही प्रत्येक कास्टिंग डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये जायचो. कामासाठी अनेकांच्या पाय देखील पडायचो.'

4/7

'पंचायत'मध्ये कसं मिळालं काम?

दुर्गेश पुढे म्हणाला, 'पंचायत' ची भूमिका फक्त 1 दिवसाची होती. मी फक्त 2.5 तास शूट केलं. बनराकसची भूमिका लिहिणाऱ्या चंदन कुमार आणि दीपक कुमार मिश्रा यांचा मी आयुष्यभर ऋणी राहेन.' 

5/7

'हायवे'मध्ये काम

2014 मध्ये दुर्गेशनं इम्तियाज अलीच्या 'हायवे' चित्रपटात काम केलं. या चित्रपटानंतर त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्याला पैशांसाठी 'व्हर्जिन भास्कर' या बी ग्रेड मालिकेत काम करावे लागले.   

6/7

बी ग्रेड मालिकेत काम करण्यावर तो म्हणाला...

'मी अभिनयाशिवाय राहू शकत नाही. माझ्या वाट्याला आलेलं प्रत्येक काम मी केलं कारण मला माझ्या क्षमतेवर विश्वास होता.'

7/7

इतर प्रोजेक्ट्स

'पंचायत 3' व्यतिरिक्त दुर्गेश 'मिसिंग लेडीज' आणि 'भक्त' सारख्या चित्रपटांमध्येही झळकला. मात्र या चित्रपटांमधून त्याला फारशी ओळख मिळाली नाही. 'पंचायत'च्या दुसऱ्या सीझनमध्ये त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याबाबत दुर्गेश सांगतो की, 'पंचायत'नंतर आता काम मिळत आहे.