मजाच मजा! Netflix पाहताय? 'या' 4 बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Netflix : सीरिज असो वा चित्रपट, देशाचं, भाषेचं बंधन नसणाऱ्या या माध्यमानं जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अशा या नेटफ्लिक्समध्ये काही बदल झाले असून, या बदलांकडे दुर्लक्ष न केलेलंच बरं. 

Jun 07, 2024, 16:37 PM IST

Netflix : नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर फार आधीपासूनच नेटफ्लिक्लची चर्चा पाहायला मिळाली आणि लॉकडाऊन काळात कर, अनेकांनीच मनोरंजनाचं साधन म्हणून या Netflix चं सब्सक्रिप्शन घेतलं. 

1/8

Netflix: येत्या काळात नेटफ्लिक्सकजून टीव्ही ॲप पूर्णपणे नवीन स्वरूपात सादर करण्यात येत आहे. ज्यामाध्यमातून युजर्सना कोणताही चित्रपट किंवा मालिका शोधणं अगदी सहज सोपं होईल.   

2/8

ॲपवर प्रेक्षकांचा वेळ वाढावा या उद्देशाने हे बदल केले जात आहेत. यामध्ये नवीन सब्सक्रिप्शन प्लॅनसुद्धा करण्यात आले आहेत जे अधिक लोकांना आकर्षित करतील.   

3/8

नेटफ्लिक्सला एका निरीक्षणातून मिळालेल्या आकडेवारीनुसार फार रंजक माहिती मिळाली, जिथं जोम स्क्रीनवर बहुतांश मंडळी कंटेट शोधण्यासाठीच वेळ घालवतता आणि इथंच त्यांच्या डोळ्यांचा व्यायाम होतो. 

4/8

हे खरंय. या निरीक्षणानुसार युजर्स विविध चित्रपट आणि सीरिजची यादी, ट्रेंडिंग सेक्शन, चित्रपट, ट्रेलर, डिस्क्रीप्शन साऱ्यादरम्यान डोळे इथून तिथं फिरवतात, ज्यामुळं एका अर्थी डोळ्यांना फायदा होतो.   

5/8

नेटफ्लिकमध्ये कोणते बदल होणार?  इथून पुढं चित्रपट आणि सीरिजचे थंबनेल अर्थात समोर दिसणारी छायाचित्र आधीपेक्षा मोठी दिसणार असून, त्यावर क्लिक करणं सोपं असेल.  कोणत्याही कलावृतीविषयी दिली जाणारी माहिती आणखी उत्तम पद्धतीनं समोर येणार असून, ती सीरिज 8 आठवडे TOP 10 मध्ये होती की नाही, याचीही माहिती मिळेल. 

6/8

नेटफ्लिक्समध्ये एक नवा टॅबही देण्यात आला असून, My Netflix tab असं त्याचं नाव असेल. इथं त्या सीरिज आणि चित्रपट दिसतील जे तुम्ही पाहत आहात किंवा ज्यांना तुम्ही फेव्हरेट लिस्टमध्ये सेव्ह केलं आहे.  इथून पुढं नेटफ्लिक्सचा मेन्यू स्क्रीनच्या वरच्या भागात दिसेल. जिथं  'होम,' 'शोज,' 'मूवीज,' आणि  'माय नेटफ्लिक्स' असे महत्त्वाचे पर्याय दिसतील.   

7/8

सध्या Netflixच्या युजरचा आकडा अंदाजे 27 कोटींच्या घरात आहे. असं असलं तरीही Netflix चं हे नवं डिझाइन तूर्तास फक्त काही निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. युजर्सच्या अनुभवाला अनुसरून यामध्ये आणखीही काही बदल केले जाऊ शकतात.

8/8

नेटफ्लिक्सकडून फक्त Users च्या संख्येवर लक्ष केंद्रित केलं जात नसून, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत युजर्स अॅपवर किती वेळ घालवतात ही बाबही केंद्रस्थानी ठेवली जात आहे. त्यामुळं नेटफ्लिक्सवर येत्या काळात दिसणारा कोणताही बदल हा युजर्सच्याच चांगल्या अनुभवासाठी आहे हे विसरुन चालणार नाही