Meena Kumar Birth Anniversary: 1 रुपयाचे नाणे आणि घटस्फोट घेऊन बनवली होती 'पाकीजा', पंतप्रधानांनी मागितली 'ट्रॅजेडी क्वीन'ची माफी

Meena Kumar Birth Anniversary : मीना कुमारी या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांचा 'पाकीजा' हा चित्रपट आयकॉनिक ठरला खरा पण तो बनण्यासाठी 14 वर्षे लागली होती. एक रुपयाच नाणे आणि मीना कुमार यांचं घटस्फोट झाला. अगदी देशाचे तत्कालीन पंतप्रधान यांनी मीना कुमार यांची माफी मागितली होती.   

| Aug 02, 2024, 13:26 PM IST
1/13

बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री जिच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेत्यापासून दिग्दर्शकापर्यंत सगळेच वाट पाहायचे. मीना कुमारी या चित्रपटांमुळे खूप प्रसिद्धी होत्या. पण त्याच्या रिअर आयुष्यात असंख्य वेदना होत्या. पतीसोबत घटस्फोट मग दारुचं व्यसन आणि अवघ्या वयाच्या 38 वर्षी जगाचा निरोप घेतला. पाकीजा हा त्यांचा आयकॉनिक चित्रपट ज्याला 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून ओळखलं जातं. त्याची खूप चर्चा झाली होती. या चित्रपटाबद्दल अनेक रंजक किस्से आहेत ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.   

2/13

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, पाकीजासाठी अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांची निवड झाली होती. पण मीना आणि धर्मेंद्र यांची जवळीक वाढताना दिसत होती. त्यामुळे मीना कुमारी यांचं पती कमल अमरोही यांनी धर्मेंद्र यांना चित्रपटातून काढून टाकले. आजही या चित्रपटामध्ये असे काही सीन्स आहेत ज्यामध्ये धर्मेंद्र लाँग शॉटमध्ये आहे. तर क्लोप अपमध्ये तुम्हाला अभिनेता म्हणून राजकुमार दिसतात.   

3/13

‘पाकीजा’चं शूटिंग सुरू झालं तेव्हा कृष्णधवल चित्रपटांचा जमाना होता, पण दुसऱ्यांदा शूटिंग सुरू झालं तोपर्यंत रंगीत चित्रपटाचा जमाना आला होता. त्यामुळे कमलला यांना पुन्हा शूटिंग करावं लागलं. पण यादरम्यान मीना आणि कमलच्या घटस्फोटाच्या बातम्या येऊ लागल्या आणि परत चित्रपटाच शूटिंग थांबलं. त्यानंतर सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या समजूतीवरून कमलने मीनाला पत्र लिहिलं आणि घटस्फोट घे पण चित्रपट कर असं सांगितलं. त्यावर मीना म्हणाल्या की ती फक्त एक रुपयाच्या नाण्याने चित्रपट करणार आहे. 

4/13

हा चित्रपट तयार होण्यासाठी 14 वर्षे लागला. तोपर्यंत मीनाही खूप बदलल्या होत्या. शेवटी त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. दारूच्या व्यसनामुळे त्या सेटवर बेहोश पडायच्या. त्यानंतर अनेक दृश्यांमध्ये मीनाच्या बॉडी डबलचा वापर शुटींगच्या वेळी करावा लागला. 

5/13

त्यावेळी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मीना कुमारी यांनी त्यांना पुष्पहार घातला तेव्हा त्यांना ओळखता आलं नाही. नंतर मंचावर त्यांनी मीना कुमारी यांची याबद्दल माफीही मागितली आणि मीना कुमारी यांना ओळखू शकत नसल्याच त्यांनी सांगितलं. 

6/13

मीना कुमारी यांचं खरं नाव मेहजबीन बानो होतं. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1933 ला बॉम्बे (आता मुंबई) मध्ये झाला. त्यांचे वडील अली बक्ष यांना मुलगा हवा होता, म्हणून जेव्हा मुलगी जन्माला आली तेव्हा त्यांनी तिला अनाथाश्रमात सोडलं, पण काही तासांनंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी मीना कुमारी यांना घरी आणलं. बानो यांनी बालपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती. त्या कधी शाळेत गेल्या नाहीत. दिग्दर्शक विजय भट्ट यांनी लहान बानोला लेदरफेसमध्ये कास्ट केलं आणि पहिल्या दिवशी 25 रुपये दिलं. हा चित्रपट 1939 मध्ये प्रदर्शित झाला होता. 

7/13

अवघ्या 4 वर्षांच्या असल्यापासून कुटुंबाला हातभार लावायच्या. सुरुवातीला त्यांनी विजय भट्ट यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांची ओळख 'बेबी मीना' म्हणून बॉलिवूडमध्ये झाली. यानंतर त्या 'बैजू बावरा', 'परिणीता', 'फूटपाथ', 'नौलखा हार' आणि 'दाना पानी' मधून हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नायिका झाल्यात. 

8/13

मीना कुमारी यांची 1938 मध्ये कमाल अमरोही यांची भेट झाली. त्यानंतर 'जेलर' चित्रपटासाठी बालकलाकाराच्या शोधात होत्या आणि अशोक कुमार यांनी 'तमाशा' चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा मीना कुमारी यांची भेट घेतली. कमलने नंतर मीनाला 'अनारकली' ऑफर केली. यानंतर मीनाचा अपघात झाला. त्यामुळे कमल हे मीना यांना बघायला रोज हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचे. चार महिन्यांमध्ये त्यांचं नात प्रेमात रुपांतर झालं.   

9/13

कमल हे आधीत विवाहित होते आणि त्यांना तीन मुलं होती. त्यामुळे 14 फेब्रुवारी 1952 ला कमल आणि मीना यांनी गुपचूप लग्न केलं. पण काही महिन्यांनंतर, लग्नाची बातमी लीक झाली आणि मीना कुमारीच्या वडिलांनी तिला घटस्फोट देण्यास सांगितलं. मात्र तिच्या आग्रहावर ठाम राहिली. 

10/13

मीना त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी नव्हती असे विनोद मेहता यांनी त्यांच्या चरित्रात नमूद केलंय. कमल मीना कुमार यांना मारहाण करून शिवीगाळ करायचे. कमलच्या असिस्टंटनेही मीना कुमारीसोबत गैरवर्तन केलं, त्यानंतर मीना कुमारी या त्यांची बहीण मधूच्या घरी गेली आणि कमलच्या घरी परतलीच नाही.

11/13

मीना कुमारी यांना निद्रानाशाचा त्रास होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मीना कुमारी यांनी अल्कोहोल आणि औषधे घेण्यास सुरुवात केली, पण हळूहळू त्यांना दारू पिण्याची सवय लागली.

12/13

1968 मध्ये मीना कुमारी यांना यकृताचा गंभीर आजार झाला. या आजारपणाच्या उपचारासाठी त्या लंडन आणि स्वित्झर्लंडमध्ये गेल्यात. 

13/13

उपचार घेतल्यानंतर मीना कामावर परतल्या, पण 'पाकीजा' रिलीज झाल्यानंतर तीन आठवड्यांनंतर 31 मार्च 1972 मीना कुमारी यांचं निधन झालं.