मासिक पाळीच्या त्रासाला नैसर्गिक पद्धतीने करा मॅनेज, 5 उपाय महत्त्वाचे
Menstrual Hygiene Day : पीरियड्स दरम्यान अनेक महिलांना खूप त्रास होतो. अशावेळी नैसर्गिक पद्धतीने मासिक पाळीच्या त्रासावर उपाय शोधू शकतो.
How To Manage Menstrual Health Naturally: दरवर्षी 28 मे रोजी 'मेंस्ट्रुअल हायजीन डे' साजरा केला जातो. या दरम्यान मासिक पाळीच्या दिवसात स्वच्छता ठेवणे अधिक महत्त्वाचे असते. तसेच या दरम्यान नैसर्गिक पद्धतीने त्रास देखील कमी केला जातो. मासिक पाळी दरम्यान काही गोष्टी सुरुवातीपासून करणे आवश्यक आहे.
युनीसेफच्या माहितीनुसार, जगभरात जवळपास 1.8 बिलियन महिलांना पीरियड्स येत असतात. यामधील 80 टक्के महिला मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासाला सामोरे जातात. तर 30 टक्के महिलांना सीवियर क्रॅम्प्स येतात. अनियमित मासिक पाळीचा चक्रामुळे 14 ते 25 टक्के महिलांना रिप्रोडक्टिव काळाज अनेक त्रासाला सामोरे जावे लागते.