PHOTO : पेट्रोलियमपासून बनवलेलं 'हे' 5 पदार्थ, ज्याचा आपण दररोज करतो वापर

पेट्रोलियम उत्पादन हे फक्त वाहनांसाठी वापरलं जातं हे सर्वसामान्यांना वाटतं. पण असं नाही आहे. आपण दैनंदिन जीवनात ज्या वस्तू किंवा पदार्थ खातो त्यामध्येही पेट्रोलियमचा वापर केला जातो. ऐकून धक्का बसला ना. 

May 28, 2024, 10:45 AM IST
1/7

कार असो किंवा बाईक यासाठी पेट्रोल आणि डिझेल लागतं. त्याशिवाय अग्नीसाठीही पेट्रोलियमचा वापर केला जातो. पण हे तेल आणि नैसर्गिक वायूपासून मिळणारी पेट्रोकेमिकल्स 6,000 पेक्षा जास्त दैनंदिन उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

2/7

आम्ही तुम्हाला अशाच 5 गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्या आपण दररोज वापर करतो. या पदार्थ किंवा वस्तूचं नाव ऐकून तुम्ही ते वापरण्यापूर्वी एकदातरी विचार कराल. 

3/7

लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना चॉकलेट आवडतात. पण त्याच्या कोटिंगमध्ये पॅराफिन मेण वापरला जातं. जे पेट्रोलियम, कोळसा किंवा शेल ऑइलपासून बनवण्यात येतं. जेव्हा ते चॉकलेटमध्ये जोडले जाते तेव्हा ते कडक होते तेव्हा एक चमक निर्माण होते. यामुळे उच्च तापमानातही चॉकलेट घट्ट राहण्यास मदत मिळते. 

4/7

टूथपेस्टमध्ये पॉलिथिलीन ग्लायकोल वापरलं जातं. पेट्रोलपासून मिळणाऱ्या या उत्पादनामध्ये ते चवदार बनवतं आणि बॅक्टेरियापासून बचाव करतं. पाण्यात विरघळणारी टूथपेस्ट बनवण्यासाठी अनेक कंपन्या पोलोक्सॅमर 407 देखील वापरतात. त्याशिवाय त्यात सोडियम सॅकरिन वापरलं जातं जे पेट्रोलियम उत्पादनांपासून बनवलं जातं. 

5/7

आपण दररोज परफ्यूम वापरतो, पण तुम्हाला माहित आहे का की नैसर्गिक तेलांऐवजी पेट्रोलियम पदार्थांमधून काढलेला सुगंध त्यात मिक्स केलेला असतो. त्याशिवास दीर्घकाळ सुगंध टिकवण्यासाठी गॅलॅक्सोलाइडचा वापर यात करण्यात येतो.

6/7

उन्हाळ्या असल्याने आपण सकाळ संध्याकाळ आईस्क्रीमवर ताव मारतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, आईस्क्रीममध्येही पेट्रोलियम पदार्थ वापरला जातो. मग ते व्हॅनिला, बदाम किंवा अगदी लिंबू चव असो. यात नैसर्गिक काहीही नसून बेंझाल्डिहाइड बदामाची चव देते आणि व्हॅनिलिन व्हॅनिलाची चव देतो. हे दोन्ही गोष्टी पेट्रोलियमपासून तयार झाले आहेत. 

7/7

शेव्हिंग क्रीममध्ये आयसोपेंटेन नावाचे तेल असून ते कच्च्या तेलापासून मिळतं. त्याशिवाय पॉलिथिलीन ग्लायकोल बहुतेकदा शेव्हिंग उत्पादनांमध्ये वापरला जातो. हे सुगंध देतात आणि घर्षण कमी करण्यास मदत करतं.