Mumbai Metro: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या वाहतूक कोंडीतून सुटका, मेट्रो 6 ला 5 उड्डाणपूल जोडणार!

MMRDA Project: उड्डाणपुलाच्या उर्वरित कामासाठी बीएमसी एमएमआरडीएला टप्प्याटप्प्याने 768.85 कोटी देणार आहे. 

| Oct 18, 2023, 12:42 PM IST

MMRDA Project:पाचही उड्डाणपूल जास्त रहदारी असलेल्या रस्त्यांवरून जाणार असून या उड्डाणपुलांची उंची इतर उड्डाणपुलांच्या तुलनेत देखील जास्त आहे.

1/8

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या वाहतूक कोंडीतून सुटका मेट्रो 6 ला 5 उड्डाणपूल जोडण्याचा निर्णय

MMRDA JVLR Project 5 flyovers to connect Metro 6 Jogeshwari Vikhroli Link Road traffic Reduce

MMRDA Project: मुंबईकर आणि विशेषत: जोगेश्वरी-विक्रोळीच्या रहिवाशांसाठी महत्वाची अपडेट आहे. लिंक रोड अंधेरी पश्चिम ते पूनम नगर, महाकाली लेणी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) येथील नागरिकांना दररोज मोठ्या ट्रॅफिक आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. पण लवकरच त्यांची यातून सुटका होणार आहे. 

2/8

एमएमआरडीएचा निर्णय

MMRDA JVLR Project 5 flyovers to connect Metro 6 Jogeshwari Vikhroli Link Road traffic Reduce

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी म्हणजेच एमएमआरडीएने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार मेट्रो लाईन 6 ला जोडून स्वामी समर्थ नगर ते विक्रोळीपर्यंतचे पाच उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. 

3/8

काम पालिकेकडून पूर्ण

MMRDA JVLR Project 5 flyovers to connect Metro 6 Jogeshwari Vikhroli Link Road traffic Reduce

जोगेश्वरी येथील  'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल' 2015 साली सुरु करण्यात आला. दरम्यान आतापर्यंत स्वामी विवेकानंद (SV) रोड ते लक्ष्मी नगर, जोगेश्वरीपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम पालिकेकडून पूर्ण झाले आहे. 

4/8

उर्वरित भाग MMRDA पूर्ण करणार

MMRDA JVLR Project 5 flyovers to connect Metro 6 Jogeshwari Vikhroli Link Road traffic Reduce

उड्डाणपुलाचा उर्वरित भाग पूर्ण करण्याची जबाबदारी बीएमसीनंतर आता एमएमआरडीएकडे देण्यात आली आहे. 

5/8

2.58 किमी लवकरच पूर्ण

MMRDA JVLR Project 5 flyovers to connect Metro 6 Jogeshwari Vikhroli Link Road traffic Reduce

मेट्रो आणि उड्डाणपूलचा ओव्हरलॅपिंग विभाग (डबल डेकर) 2.58 किमी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच डबल डेकर उड्डाणपूल आणि  हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल यांना जोडणारे 2.57 किमी बांधकाम कधी पूर्ण होणार? याकडे लक्ष लागले आहे.

6/8

पालिकेकडून 50 टक्के रक्कम जमा

MMRDA JVLR Project 5 flyovers to connect Metro 6 Jogeshwari Vikhroli Link Road traffic Reduce

उड्डाणपुलाच्या उर्वरित कामासाठी बीएमसी एमएमआरडीएला टप्प्याटप्प्याने 768.85 कोटी देणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने  MMRDA कडे 384.5 कोटी (एकूण 50%) जमा केले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

7/8

काम लवकरच सुरू

MMRDA JVLR Project 5 flyovers to connect Metro 6 Jogeshwari Vikhroli Link Road traffic Reduce

बहुप्रतिक्षित उड्डाणपुलांचे काम लवकरच सुरू होणार असून, गेल्या महिनाभरात कंत्राटदार आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

8/8

मुंबईकरांना मोठा दिलासा

MMRDA JVLR Project 5 flyovers to connect Metro 6 Jogeshwari Vikhroli Link Road traffic Reduce

पाचही उड्डाणपूलांची उंची तुलनेत जास्त आहे. तसेच हे जास्त ट्रॅफीक असलेल्या रस्त्यांवरुन जातात. त्यामुळे या मार्गावरुन रोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.