महाराष्ट्रातील उलटा धबधबा; गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशने वाहतो

हा अनोखा धबधबा महाराष्ट्रातील नाणेघाट धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटक मोठ्या संख्येने या धबधब्याला भेट देत असतात. 

Jul 13, 2023, 23:05 PM IST

Reverse Waterfall In Maharashtra : भारतात तुम्हाला निसर्गाशी संबंधित असे आश्चर्य पाहायला मिळेल, जे तुम्ही कदाचित याआधी कधीच पाहिले नसेल. हे आश्चर्य महाराष्ट्रात आहे, जिथे एक धबधबा वरपासून खालपर्यंत वाहण्याऐवजी खालून वर जातो. होय, तुम्ही अनेक धबधबे पाहिले असतील, पण असा उलटा धबधबा तुम्ही कधी पाहिला आहे का? चला तुम्हाला या धबधब्याबद्दल काही रंजक गोष्टींची माहिती घेऊया. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशने वाहणारा हा धबधबा म्हणजे एक नैसर्गित आश्चर्य मानले जाते. 

1/8

हा धबधबा कोकण समुद्रकिनारा आणि जुन्नर नगरच्या मध्ये आहे.

2/8

शास्त्रज्ञांच्या मते या ठिकाणी वारे खूप वेगाने वाहतात, त्यामुळे पाणी उलट्या दिशेने वाहत असते. जोराच्या वाऱ्यामुळे धबधब्यातून खाली पडणारे पाणी पुन्हा वर येते.

3/8

उलट्या दिशेने प्रवाहित होणारा हा धबधा पाहून पर्यटक थक्क होतात.  

4/8

हा धबधबा उंचीवरून खाली पडल्यानंतरही मागे सरकतो.

5/8

वरून पडणाऱ्या गोष्टी नेहमी जमिनीवर पडतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण नाणेघाट धबधबा हा नियम मोडतो.

6/8

हा धबधबा  गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या विरुद्ध प्रवाहित होतो.  

7/8

धबधब्याचे जलस्रोत मुख्यतः नाणेघाटाच्या डोंगरातून आहेत. या ठिकाणच्या निसर्गसौंदर्यामुळे येत्या पावसाळ्यात या परिसरात मोठी गर्दी असते.

8/8

या धबधब्याला उलटा धबधबा असेही म्हणतात.