Monsoon Romantic Destinations : पावसाळ्यात पार्टनरसोबत 'या' ठिकणी नक्कीच ज्या भेट

Monsoon Romantic Destinations : पावसाळा सुरु झाला की सगळ्यांना आता फिरायला कुठे जायचं असा प्रश्न उपस्थित राहतो. हा प्रश्न फक्त तरुणाईला ज्यांना मैत्र-मैत्रिणींसोबत फिरायला जायचं असतं त्यांनाच नाही, तर  आपल्या पार्टनरसोबत रोमँटिक ठिकाणी जाणाऱ्यांपण असतो. खरंतर या काळात फिरण्याची एक वेगळीच मज्जा असते. आता तुम्हाला जर तुमच्या पार्टनरसोबत कुठे जायला हवं असा विचार येत असेल तर जाणून घेऊया अशी काही ठिकाण जिथे तुम्हाला पावसाळ्यात फिरायला नक्कीच मज्जा येईल...

| Jun 24, 2023, 19:07 PM IST
1/7

कुर्ग, कर्नाटक

Monsoon Romantic Destinations

कुर्ग हे कर्नाटकातील एक सुंदर हिल स्टेशन आहे. हिरवेगार कॉफीचे मळे, धुके असलेले डोंगर आणि वाहणारे धबधबे, पावसाळ्यात शांतता शोधणाऱ्या जोडप्यांसाठी कूर्ग हे एक रोमँटिक आणि शांत ठिकाण आहे.

2/7

शिलाँग, मेघालय

Monsoon Romantic Destinations

मेघालयची राजधानी असलेल्या शिलाँगला त्याच्या सुंदर लँडस्केपमुळे इस्टचे स्कॉटलंड म्हणून ओळखतात. मान्सूनचा पाऊस त्याच्या धबधब्यांमध्ये, वाहत्या टेकड्यांमध्ये आणि प्राचीन तलाव देखील आहेत. ज्यामुळे ते रोमँटिक ट्रिपसाठी  एक उत्तम ठिकाण बनते.

3/7

गोवा

Monsoon Romantic Destinations

गोवा समुद्रकिनारे आणि नाइटलाइफसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पाऊस आणि निर्मळ समुद्रकिनारा हे जोडप्यांसाठी एक परिपूर्ण रोमँटिक स्थळ नक्कीच ठरेल.

4/7

उदयपूर, राजस्थान

Monsoon Romantic Destinations

पूर्वेचे व्हेनिस म्हणून उदयपूर ओळखले जाते. उदयपूर हे तलाव आणि राजवाड्यांचे शहर आहे. मान्सून मध्ये या ठिकाणचे वातावरण खूपच रोमँटिक होऊन जाते.  ज्यामुळे ते जोडप्यांसाठी एक योग्य सुट्टीचे ठिकाण बनते.

5/7

मुन्नार, केरळ

Monsoon Romantic Destinations

हिरव्यागार चहाच्या बागांमध्ये वसलेले, केरळमधील मुन्नार पावसाळ्यात अधिक मनमोहक बनते. धुक्याने झाकलेल्या टेकड्या, धबधबे आणि रोमँटिक हवामान हे जोडप्यांसाठी योग्य ठिकाण बनवते.  

6/7

अॅलप्पी, केरळ

Monsoon Romantic Destinations

बॅकवॉटर आणि हाऊसबोट क्रूझसाठी ओळखले जाणारे अॅलप्पी पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसते. पावसाने भिजलेली निसर्गरम्य दृश्ये आणि शांत बॅकवॉटर जोडप्यांना हे रोमँटिक क्षण एकत्र घालवण्याची संधी देतात.

7/7

महाबळेश्वर, महाराष्ट्र

Monsoon Romantic Destinations

पश्चिम घाटात वसलेले, महाबळेश्वर हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. येथे सुंदर स्पॉट आणि स्ट्रॉबेरी फील्डसाठी ओळखले जाते. जिथे जोडपे सुंदर आणि निवांत क्षणांचा आनंद घेऊ शकतात.