महाराणीच ती... दरारा, रुबाब अन् स्टाईल स्टेटमेंट पाहून भारावून जाल

Most stylish Maharanis in india: भारतीय इतिहासामध्ये सौंदर्य, राजकारण आणि चौकटीबद्ध जगण्याचा शह देणाऱ्या या महाराणी तुम्हाला माहितीयेत?   

Jan 09, 2024, 15:39 PM IST

Most stylish Maharanis in india: भारताच्या इतिहासात डोकावून पाहिलं असता विविध काळ आणि त्या काळानुसार पुढं आलेली माणसं आपल्याला भारावून सोडतात. 

1/7

राणीसाहेब

Most stylish Maharanis in Indian history see photos and their style statment

अशा या इतिहासाच्या अनेक पानांमधील एका पानावर जरा जास्त वेळ नजर खिळते. हे पान आहे, देशातील स्टाईल डिवा राणी दिसाच्या तरी कशा याबद्दलचं...   

2/7

महाराणी गायत्री देवी

Most stylish Maharanis in Indian history see photos and their style statment

भारत आणि युरोपात ज्यांच्या स्टाईल स्टेटमेंटची सर्वाधिक चर्चा झाली, त्या म्हणजा महाराणी गायत्री देवी. पेस्टल शेडच्या शिफॉन साड्या, मोत्याचे नेकलेस आणि लांब बाह्यांचा ब्लाऊज, वेळप्रसंगी सूटाबुटातील रुबाब असा त्यांचा लूक कायमच पाहायला मिळायचा.   

3/7

महाराणी इंदिरा देवी (वडोदरा, कूचबिहार)

Most stylish Maharanis in Indian history see photos and their style statment

भारतात सिल्क शिफॉन साड्यांचा ट्रेंड आणणारं एक नाव म्हणजे इंदिरा राजे. अद्वितीय इच्छाशक्ती आणि जिद्द असणाऱ्या महाराणी इंदिरा देवी यांचा फॅशन सेन्स आजच्या अनेक सौंदर्यवतींना लाजवणारा होता.   

4/7

महाराणी सितारा देवी (वडोदरा)

Most stylish Maharanis in Indian history see photos and their style statment

ड्रेसिंग रुममध्ये हजारो साड्या असणारी ही राणी म्हणजे महाराणी सितारा देवी. साडीच्याच रंगाचे शूज, पर्स आणि दागिन्यांना त्यांनी कायमच पसंती होती. फ्रेच शिफॉन साड्या ही त्यांची ओळख होती.   

5/7

प्रिन्सेस निलोफर फरहत बेगम साहिबा

Most stylish Maharanis in Indian history see photos and their style statment

बंड करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रिन्सेस निलोफर फरहत बेगम साहिबा समाजाच्या अनेक रुढींना झुगारून लावत होत्या. त्यामुळं त्यांच्या लूकमध्ये कायमच पाश्चिमात्य संस्कृतीची झलक पाहायला मिळत होती.   

6/7

महाराणी जिंद कौर

Most stylish Maharanis in Indian history see photos and their style statment

प्रेम आणि नात्यासाठी संघर्ष करणारी या राणी तिच्या शाही पेहरावासाठी ओळखल्या जात होत्या. रत्नजडित दागिने, चोळी, पंजाबी घागरा, ओढणी असा त्यांचा लूक असे.   

7/7

प्रिन्सेस कमर (कपूरताळा)

Most stylish Maharanis in Indian history see photos and their style statment

या राणीनं कायमच युरोप आणि भारतीय संस्कृतीचा मेळ साधत पेहरावाला प्राधान्य दिलं. Madeleine Vionnet, Jeanne Paquin, Coco Chanel हे त्यांचे आवडते ब्रँड.