Mouni Roy च्या आयुष्यातील 'ती' गोष्ट अखेर समोर, लग्नानंतर काही दिवसांत...

लग्नानंतर मौनी रॉयचे आयुष्यातील मोठी गोष्ट समोर... पती आणि खास व्यक्तीसोबत फोटो शेअर करत म्हणाली... 

Apr 29, 2022, 08:52 AM IST

वर्षाच्या सुरूवातीलाचं टीव्हीवरील प्रसिद्ध आणि सौंदर्यवती मौनी रॉयने लग्न करून नव्या आयुष्याला सुरूवात केली. मौनीने लाँग टाइम बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत विवाह केला आहे.  27 जानेवारी रोजी विवाह सोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले फोटोंमध्ये दोघे प्रचंड गोड आणि सुंदर दिसत होते. लग्नात मौनीच्या सौंदर्याने आणि सुरजच्या रुबाबदार लूकमुळे सर्वांच्या नजरा दोघांवर थांबल्या होत्या. 

1/5

आता मौनी आणि सुरजचे लग्नातील अनसीन फोटो तुफान व्हायरल होत आहेत. लग्नानंतर अनेक दिवसांनी दोघांचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत.   

2/5

मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या यांचं लग्न खास लोकांच्या उपस्थितमध्ये पार पडलं होतं. ज्यामध्ये आमना शरीफ आणि मंदिरा बेदी मौनीच्या वतीने प्रत्येक विधीमध्ये आपली उपस्थिती नोंदवली होती.   

3/5

सूरज नांबियार सऊथ इंडियन तर मौनी रॉय बंगाली आहे. त्यामुळे दोन्ही पद्धतीनं विवाह सोहळा पार पडला आहे. या विवाह सोहळ्यातील काहीफोटो सध्या चर्चेत आहे. या फोटोमध्ये मौनी रॉयचा पुन्हा एकदा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.   

4/5

खुद्द मौनीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. आईच्या वाढदिवसाचं औचित्य साधत तिने आईसोबत काही फोटो शेअर केले आहेत.   

5/5

फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'माझं घर... माझं जग... आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... हरी ओम...' असं लिहिलं आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.