Mumbai Local नं प्रवास करणाऱ्यांची लागली वाट! आताच शोधा प्रवासाचा पर्यायी मार्ग

Mumbai Local : दर दिवशी मुंबई लोकलनं अनेकजण प्रवास करतात. आपल्या घरातून निघून ही मंडळी इच्छित स्थळी पोहोचता. नोकरीच्या, शिक्षणाच्या किंवा आणखीही बऱ्याच कारणांनी हा प्रवास केला जातो.   

Jun 10, 2023, 07:37 AM IST

Mumbai News : शनिवार आणि रविवार या दिवसांना अनेक कार्यालयं बंद असली तरीही मुंबईच्या दिशेनं येणाऱ्यांची संख्या मात्र कमी झाल्याचं दिसत नाही. पण, आता मात्र या मुंबईत प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा होणार आहे. 

 

1/8

दैनंदिन प्रवाशांची गर्दी कमी

Mumbai Local Train Mega Block latest updates on time table

Mumbai Local Train Mega Block: तुलनेनं शनिवार आणि रविवारी मुंबईच्या लोकलमध्ये या दैनंदिन प्रवाशांची गर्दी कमी असली तरीही भटकंतीसाठी आलेल्यांचा आकडा मात्र मोठा असतो.   

2/8

प्रवाशांचा खोळंबा

Mumbai Local Train Mega Block latest updates on time table

रविवारी मात्र या सर्वच प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. त्यामुळं त्यांनी आतापासूनच शहरात प्रवासासाठी पर्यायी मार्ग शोधणं उत्तम असेल, कारण रविवारी मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मोगा ब्लॉक आहे. 

3/8

मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक

Mumbai Local Train Mega Block latest updates on time table

मध्य आणि हार्बर रेल्वेवरील रूळ पाहणी आणि दुरूस्ती, सिग्नल यंत्रणा आणि पायाभूत कामं पूर्ण करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

4/8

कोणत्या मार्गावर ब्लॉक?

Mumbai Local Train Mega Block latest updates on time table

रविवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल.

5/8

मेगाब्लॉकच्या वेळा

Mumbai Local Train Mega Block latest updates on time table

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल.   

6/8

हार्बर रेल्वे

Mumbai Local Train Mega Block latest updates on time table

हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर हा मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी 11.05 ते 4.05 वाजेपर्यंत परिणाम हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.   

7/8

कोणत्या सेवा प्रभावित?

Mumbai Local Train Mega Block latest updates on time table

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल आणि बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत ही बाब प्रवाशांनी लक्षात घ्यावी. 

8/8

ट्रान्सहार्बर

Mumbai Local Train Mega Block latest updates on time table

अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेलहून ठाण्याला जाणारी लोकल सेवा आणि ठाणे येथून पनवेलकडे सुटणारी डाऊन लोकल सेवा रद्द असेल. तर, ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील.