गुरुवारी अर्ध्याहून अधिक मुंबईत पाणीकपात; तुम्ही राहता त्या परिसरात काय परिस्थिती?

Mumbai News : मुंबईकर आणि पाणीकपात हे समीकरण आता सर्वज्ञात झालं आहे. दर आठवड्याला कमीजास्त प्रमाणआत शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीकपात किंवा पाणीटंचाई लागू असते. 

Jan 03, 2024, 08:53 AM IST

Mumbai News : मुंबईमध्ये पालिकेच्या वतीनं लागू होणाऱ्या लहानसहान बदलांचा परिणाम नागरिकांच्या जीवनावर होत असतो. शहरातील नागरिकांवर परिणाम करणारी अशीच एक बातमी नुकतीच समोर आली आहे. 

1/7

गुरुवारी पाणीकपात

Mumbai water shortage on thursday latest update news

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवारी, 4 जानेवारी 2024 रोजी अर्ध्याहून अधिक मुंबईमध्ये पाणीकपात लागू असणार आहे.   

2/7

पाणीगळती

Mumbai water shortage on thursday latest update news

पालिकेच्या पवई वेन्चुरी येथे असणाऱ्या अप्पर वैतरणा आणि वैतरणातील 900 मिमी व्यास असणाऱ्या एका जलवाहिनीमध्ये पाणीगळती सुरु झाली आहे. त्यामुळं या जलवाहिनी दुरुस्तीचं काम पालिका हाती घेणार आहे. 

3/7

दुरुस्तीचं काम

Mumbai water shortage on thursday latest update news

4 ते 5 जानेवारीदरम्यान हे काम हाती घेण्यात येणार असून, त्यामुळं शहरातील बहुतांश भागांमध्ये 10 टक्के पाणीकपात लागू असणार आहे. 

4/7

पाणीपुरवठा बंद

Mumbai water shortage on thursday latest update news

पालिकेच्या सूचनांनुसार गुरुवारी एल वॉर्डमध्ये 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहील. तर, एस विभागात 4 जानेवारीला दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. 

5/7

कुठे पाणीकपात?

Mumbai water shortage on thursday latest update news

याशिवाय ए, सी, डी, ई, जी उत्तर आणि दक्षिण यासोबतच एच पूर्व आणि पश्चिम या वॉर्डमध्ये 10 टक्के पाणीकपात लागू असणार आहे. 

6/7

पाण्याचं नियोजन

Mumbai water shortage on thursday latest update news

पाणीकपातीच्या या निर्णयामुळं शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहेत. त्यामुळं गुरुवारच्या दिवसासाठी पाण्याचं नियोजन करण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. 

7/7

पाणीपुरवठा बंद!

Mumbai water shortage on thursday latest update news

पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या प्रभागांना या पाणीकपातीचा फटका बसू शकतो त्यामुळं पाणी जपून वापरा!