Photos: अभिनेत्रीने कास्टिंग डायरेक्टरचे केले 300 तुकडे! मृतदेहासमोरच बॉयफ्रेंडबरोबर शरीरसंबंध; त्यानंतर...

Shocking Murder Case That Shook Bollywood: अगदीच धक्कादायक पद्धतीने एखाद्या संपवल्याचं कथनाक असलेले चित्रपट किंवा वेब सिरीज तुम्ही नक्कीच पाहिल्या अशतील. मात्र अशाच कथानकाला साजेश्या घटनेनं मुंबई एकेकाळी हादरून गेली होती. नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात...

| Aug 22, 2024, 17:15 PM IST
1/11

maria monica susairaj

तिने तिच्या अगदी जवळच्या मित्राला संपवण्यामध्ये बॉयफ्रेंडची मदत केली. या प्रकरणामध्ये मनोरंजनसृष्टी हादरून गेलेली, नेमका घटनाक्रम काय ते पाहूयात...

2/11

maria monica susairaj

या प्रकरणामध्ये एकूण तीन मुख्य लोकांचा समावेश होता. पहिली व्यक्तीन नीरज ग्रोवर, जो बालाजी प्रोडक्शनमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करत होता. नीरज या अभिनेत्रीचा चांगला मित्र होता.  

3/11

maria monica susairaj

दुसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेली कन्नड अभिनेत्री, मारिया मोनिका सुसाइराज! सदर प्रकरणातील तिसरी व्यक्ती मारियाचा प्रियकर लेफ्टनंट जेरोम मॅथ्यू हा होता. जेरोम आणि मारियाचा साखरपुडा होणार होता.  

4/11

maria monica susairaj

मारिया मोनिका सुसाइराज कोण होती हे आधी जाणून घेऊयात. तर मारिया ही एक नावाजलेली कन्नड अभिनेत्री होती. हिंदी चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमवण्यासाठी ती मुंबईमध्ये आली होती. मैसूरमधील ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलेली मारियाने लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं.  

5/11

maria monica susairaj

मात्र मारिया मोनिका सुसाइराजने अभिनेत्री होण्याच्या निर्णयाला तिच्या कुटुंबियांचा विरोध होता. निर्मात्यांच्या कार्यालयांचे उंबरे झिजवल्यानंतर मारियाला छोट्या छोट्या भूमिका मिळू लागल्या. 2002 मध्ये मारियाला कन्नड चित्रपटामध्ये मोठी भूमिका मिळाली. मात्र हा चित्रपट जोरदार पडला. त्यानंतर तिने मुंबईची वाट पकडली.  

6/11

maria monica susairaj

मुंबईमध्ये आल्यानंतर मारिया मोनिका सुसाइराजची ओळख बालाजी प्रोडक्शन हाऊसमध्ये कास्टिंगचं काम करणाऱ्या नीरज ग्रोवरबरोबर झाली. दोघांमध्ये अगदी फार कमी वेळात चांगली मैत्री झाली. मात्र एक दिवस नीरज ग्रोवर अचानक गायब झाला.   

7/11

maria monica susairaj

नीरज ग्रोवर शेवटी मैत्रीण मारियाच्या घरी शिफ्टींगमध्ये मदत करण्यासाठी गेला होता. मात्र त्यानंतर नीरज बेपत्ता झाला. मात्र अनेक दिवस शोध घेतल्यानंतरही नीरज सापडला नाही. अखेर काही दिवासांनी पोलिसांना एका मोबाईल टॉवरच्या मदतीने त्याची लोकेशन सापडली. यानंतर पोलिसांनी मारियाला अटक केली. मारियानेच नीरजची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे 300 तुकडे केल्याची कबुली दिली.

8/11

maria monica susairaj

आता या प्रकरणामध्ये कथेतील तिसरी व्यक्ती आणि मारिया मोनिका सुसाइराजचा प्रियकर जेरोम मॅथ्यूची एन्ट्री होते. मारियाला प्रियकर असल्याची कल्पना नीरजला नव्हती. जेरोम मारियाबद्दल फारच पझेसिव्ह होता. एकदा मारियाबरोबर फोनवर बोलताना जेरोमला तिने मुंबईत घर भाड्याने घेतल्याचं समजलं. तसेच मारियाला घर शिफ्ट करण्यासाठी नीरज मदत करणार असल्याचं जेरोमला समजलं. (फोटोत जेरोम मॅथ्यू)

9/11

maria monica susairaj

मारियाने जेरोमला घर शिफ्ट केल्यानंतर ती नीरजबरोबर दोन आठवडे लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहिली होती हे सांगितलं नाही. हे समजल्यानंतर जेरोम अचानक मुंबईत आला. त्यावेळे त्याने नीरज आणि मारियाला एकत्र पाहिल्यानंतर त्याच्या रागाचा पार चढला. त्याने रागाच्याभरात त्याने नीरजचा जीव घेतला.  

10/11

maria monica susairaj

जेरोमचा राग शांत जाला तेव्हा त्याच्या हातून काय घडलं आहे हे त्याला जाणवलं. त्यानंतर जेरोम आणि मारियाने आपलं हे कृत्य लपवण्यासाठी नीरजच्या शरीराचे 300 तुकडे केले. एवढचं नाही तर नीरजच्या मृतदेह समोर असतानाच मी आणि जेरोमने शरीरसंबंध ठेवल्याचा खुलासाही या अभिनेत्रीने केला. 

11/11

maria monica susairaj

जेरोम आणि मारियाने नीरजचा मृतदेहाच्या तुकड्याची विल्हेवाट वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. नीरजचा मोबाईल मारियाकडेच होता. पळून जाताना नीरजचा फोन वाजला तेव्हा कोणाचा फोन आहे हे तपासण्यासाठी तिने फोन बाहेर काढताना कॉल रिसिव्ह जाला आणि फोन ट्रेस होऊन या हत्याकांडाचा खुलासा झाला. या प्रकरणामध्ये मारियाला 3 वर्षांची तर जेरोमला 10 वर्षांची शिक्षा झाली.