अखेर बहुप्रतीक्षित मेट्रो सुरू! कुणाला होणार फायदा? पाहा नवीन मेट्रोचा मार्ग, तिकीट दर

तब्बल 12 वर्षांनंतर नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी मेट्रो सज्ज झाली आहे. 17 नोव्हेंबर 2023 रोजी नवी मुंबई मेट्रो 1 ची सेवा सुरूव झाली आहे. या मेट्रोमुळं कोणाला फायदा होणार, हे जाणून घेऊया. 

| Nov 17, 2023, 18:19 PM IST

Navi Mumbai Metro: तब्बल 12 वर्षांनंतर नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी मेट्रो सज्ज झाली आहे. 17 नोव्हेंबर 2023 रोजी नवी मुंबई मेट्रो 1 ची सेवा सुरूव झाली आहे. या मेट्रोमुळं कोणाला फायदा होणार, हे जाणून घेऊया. 

1/7

अखेर बहुप्रतीक्षित मेट्रो सुरू! कुणाला होणार फायदा? पाहा नवीन मेट्रोचा मार्ग, तिकीट दर

Navi Mumbai s first Metro line to begin services from 17 nov Route Map & tickit price

नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ 17 नोव्हेंबरपासून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मेट्रो सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार आजपासून मेट्रो सेवा सुरू झाली आहे. तब्बल 12 वर्षांनंतर नवी मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे.

2/7

पहिला टप्पा

Navi Mumbai s first Metro line to begin services from 17 nov Route Map & tickit price

नवी मुंबई मेट्रो सध्या पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. बेलापूर ते पेंढारपर्यंत 11 किमीचा पहिला टप्प्यात मेट्रो सेवा असेल. या मेट्रोमुळं पनवेलकरांना मुंबई गाठणे सोप्पे होणार आहे. 

3/7

वेळापत्रक

Navi Mumbai s first Metro line to begin services from 17 nov Route Map & tickit price

नवी मुंबई मेट्रो पेंढर (तळोजाजवळ) ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंढर दरम्यान सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता असेल.

4/7

प्रकल्पाचा एकूण खर्च

Navi Mumbai s first Metro line to begin services from 17 nov Route Map & tickit price

 मेट्रो सुरू करण्यासाठी ऑक्टोबर 2021 मध्ये सीएमआयईएस प्रमाणपत्र मिळाले होते. मात्र विविध कारणांमुळं सेवा सुरू होऊ शकली नव्हती. या प्रकल्पाचा एकूण खर्च 3063 कोटींचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

5/7

तिकिटाचे दर

Navi Mumbai s first Metro line to begin services from 17 nov Route Map & tickit price

 मेट्रोकडून प्रवासीभाडेदेखील ठरवण्यात आले आहे.  2 किमीसाठी 10 रुपये, 2 ते 4 किलोमीटरसाठी 15 रुपये भाडे असेल. त्यांनंतर प्रति 2 किलोमीटरसाठी 5 रुपये भाडे वाढवण्याचा प्रस्ताव आहे. 10 किमीपासून पुढे 40 रुपये भाडे असेल. बेलापूर ते  पेंढरपर्यंतचे भाडे 40 रुपये असणार आहे. 

6/7

11 स्थानके

Navi Mumbai s first Metro line to begin services from 17 nov Route Map & tickit price

बेलापूर ते पेंढर (तळोजाजवळ) पर्यंत 11 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी 11 स्थानके आहेत.  बेलापुर, सेक्टर-7 बेलापुर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर 11 खारघर, सेक्टर 14 खारघर, सेंट्रल पार्क, पेथापाड़ा, सेक्टर 34 खारघर, पंचनद और पेंढर टर्मिनल ही स्टेशन आहेत.

7/7

प्रमुख वैशिष्ट्ये

Navi Mumbai s first Metro line to begin services from 17 nov Route Map & tickit price

मेट्रो स्थानकांवर  पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था,  सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात  दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.