Navratri 5th Day 2023 : बंध नात्यांचे...रंग ऋणानुबंधाचे! नवरात्रीचं पाचवं नातं : नणंद वहिनी

Navratri 5th Day 2023  : नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. नवरात्रीचं पाचवं नातं हे नणंद वहिनी...नवरात्रीच्या नऊ दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवस देवाच्या एका रुपाची पूजा केली जाते. तर वारानुसार रंग परिधान केला जातो. 

Oct 19, 2023, 14:12 PM IST
1/7

स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि त्याची आई म्हणजे पार्वती.

2/7

दुर्गेचं हे पाचवे रूप मोठं लोभस आणि वात्सल्याने परिपूर्ण आहे. कारण कुमार संभवात असे वर्णन आहे की आपल्या मुलाला हातात घेतल्यावर प्रेमाने, वात्सल्याने पार्वतीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आणि तिच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या.

3/7

याच दुधावर जेव्हा साय धरते तेंव्हा त्याचा रंग किंचित पिवळसर असतो.  

4/7

पिवळा रंग ऐश्वर्याचं आणि बहराचं प्रतीक मानला जातो. कृष्णाच्या पितांबराचा रंग पिवळा... आणि नववधूच्या नव्या नात्यात कोमल तनुवर लागणारा हळदीचा रंग ही पिवळा..

5/7

 ही हळद लेऊन जेव्हा मुलगी लग्नकरून नव्या घरी जाते, तेंव्हा वेगवेगळ्या नात्यांना आपलंसं करते. यातलचं एक आंबट गोड नातं, नणंद भावजयीचं.

6/7

याच नात्याने संसाराला चव येते. कधी नणंद म्हणून वहिनीची बाजू घ्यावी तर कधी बहीण म्हणून भावाला साथ द्यावी.. 

7/7

भुलाबाईच्या गाण्यात हे नाते छान उलगडले आहे..