13 वर्षांची असताना पदवी, 22 व्या वर्षी PHD; या चिमुकलीनं इतिहास घडवला

Naina Jaiswal Photos: नयना जैस्वाल या तरुणीने नवा विक्रम रचला आहे. नयनाने वयाच्या 22 व्या वर्षी डॉक्टरेट मिळवली आहे. 

Feb 06, 2024, 15:17 PM IST

Naina Jaiswal Youngest Phd Holder India:  नयना जैस्वाल हिने वयाच्या 22 व्या वर्षी डॉक्चरेट पदवी मिळवली आहे. ज्या वयात मुलं लिहायला वाचायला शिकतात त्या वयात नयना  शालेय शिक्षणातील महत्वाचा टप्पा असणारी दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाली. वयाच्या 13 व्या वर्षी नयाने पदवी मिळवली आहे. नयना सोशल मिडियावर देखील चांगलीच एक्टीव्ह आहे. 

 

1/7

टेनिसपटू नयना जैस्वाल हिने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. नयनाने नवा विक्रम रचला आहे.   

2/7

 फक्त अभ्यासच नाही तर नयना खेळातही निपुण आहे. नयना ही आंतरराष्ट्रीय दर्जाची टेनिस पटू आहे. टेबल टेनिस खेळात नयनाने राष्ट्रीय व दक्षिण आशिया चॅम्पियनचा किताब पटकवला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने अनेक सुवर्ण, रौप्य व कास्यपदके पटकावली आहेत.   

3/7

नयनाने वयाच्या 13 व्या वर्षी पत्रकारिता व जनसंवादाची पदवी मिळवली. त्यानंतर वयाच्या 15 व्या वर्षी तिने उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. आशियातील सर्वांत तरुण पदव्युत्तर पदवीधर असण्याचा विक्रम तिने रचला. नयनाने काद्याची पदवीही प्राप्त केली आहे.  

4/7

अवघ्या आठव्या वर्षी नयना दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. तर, अवघ्या दहाव्या वर्षी तिने इंटरमिजिएटचे शिक्षण पूर्ण केले.

5/7

महिला सक्षमीकरणासाठी मायक्रो फायनान्सचे योगदान किती आहे या विषयावर नयाने  PHD पदवी संपादित केली आहे. 

6/7

नयाने वयाच्या 17 व्या  पीएच.डी.चा अभ्यास सुरू केला होता. 22 व्या वर्षी नयनाने PHD ची पदवी मिळवली आहे. 

7/7

तेलगंणातील मेहबूबनगरमधील रहिवासी असलेल्या नयनाचे कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.