PHOTO : दोन घटस्फोट, दोन मुलींच्या वडिलांवर जडला जीव, लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर 'या' मराठी अभिनेत्रीने थाटला संसार

Entertainment : बिग बॉस 12 फेम आणि बालकलाकार म्हणून या मराठी अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पण अभिनेत्रीच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती कायम चर्चे असते. दोन वेळा घटस्फोट झालेल्या आणि दोन मुलींच्या वडिलांच्या ती प्रेमात पडली. 

| Nov 29, 2024, 11:26 AM IST
1/7

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिचं खरं नाव शुभांगी आहे. ती आज 29 नोव्हेंबरला वाढदिवस साजरा करत आहेत. मराठी, हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही तिनं काम केलंय. 

2/7

बिग बॉस सीझन 12 ची स्पर्धकही राहिली ही अभिनेत्री आहे नेहा पेंडसे. नेहा ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त नेहा पेंडसे चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रायोजकत्वातून पैसे कमवते. 

3/7

भाबीजी घर पर है ची अनिता भाभी म्हणून तिचा खास ओळख आहे. 1995 मध्ये नेहाने कॅप्टन हाऊस या मालिकेतून पदार्पण केले. याशिवाय ती शाहरुख खानच्या देवदास या चित्रपटातही ती झळकली. 

4/7

नेहा पेंडसेचे मुंबईत आलिशान अपार्टमेंट आहे. कार कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर नेहाकडे BMW सारख्या कार आहेत. तिच्या करिअरपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ती चर्चेत असते. नेहा पेंडसे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहाचे तिच्या इंस्टाग्राम हँडलवर 1.8 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

5/7

नेहा पेंडसेही तिच्या बोल्ड स्टाइलमुळेही खूप चर्चेत असते.  प्रत्येक मुद्द्यावर मनमोकळेपणाने बोलणाऱ्या नेहाने अनेक विषयांवर आपले मत मांडले आहेत. त्यामुळे ती अनेक वेळा वादातही सापडली आहे. 

6/7

एका पार्टीदरम्यान तिची भेट बिझनेसमन शार्दुल सिंह बियासलाशी झाली. शार्दुलचा दोन वेळा घटस्फोट झाला होता. शिवाय दोन्ही लग्नातून त्याला एक एक मुलगी आहे. दोन मुलींचा वडिलांच्या प्रेमात नेहा पडली. दोन वर्ष ती लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर ती शार्दुलची तिसरी बायको झाली. 

7/7

जेव्हा चाहत्यांनी शार्दुलबद्दल कमेंट करायला सुरुवात केली तेव्हा अभिनेत्री स्वतःला रोखू शकली नाही. तिने मीडियासमोर खुलासा केला की शार्दुलने लग्नाआधी तिचे अयशस्वी लग्न आणि मुले या दोन्ही गोष्टी तिला सांगितल्या होत्या. नेहाने तिच्या वक्तव्यात म्हटले होते की, 'मी सुद्धा व्हर्जिन नाही. जर माझ्या पतीवर याचा परिणाम होत नसेल तर त्याचा माझ्यावरही परिणाम होऊ नये.