IPL 2024 : ना रोहित ना धोनी.., आत्तापर्यंत 'या' खेळाडूंनी गाजवलेत आयपीएलचे सिझन

IPL 2024: येत्या 22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. यंदाचा आयपीएलचा हा 17 वा सिझन आहे. गेल्या सिझनमध्ये कोणत्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केलीये, यावर एक नजर टाकूया.

| Mar 04, 2024, 18:36 PM IST
1/7

आयपीएल सुरु होण्यासाठी आता अवघा काही काळ उरला आहे. यावेळी 22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. 

2/7

जर सिझनमध्ये सर्वाधिक रन करण्यावर नजर टाकली तर 2023 मध्ये शुभमन गिलने सर्वाधिक रन केले होते.

3/7

मात्र जर आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकली तर गौतम गंभीरने या लीगमध्ये तीन वेळा सर्वाधिक रन केले आहेत. गंभीरने 2008, 2012 आणि 2017 मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या.

4/7

सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल असं संबोधलं जातं त्याने अनेकवेळा स्फोटक खेळी खेळल्या आहेत. तर विराट कोहली देखील यामध्ये मागे नाहीये. 

5/7

विराट कोहलीने 2011 मध्ये पहिल्यांदा सर्वाधिक रन्स केले होते. यानंतर त्याने 2013 आणि 2016 मध्येही सर्वाधिक धावा केल्या होत्या.

6/7

केएल राहुलने 2019, 2020 आणि 2022 मध्ये सर्वाधिक रन्स केले होते. ऋषभ पंतने 2018 मध्ये सर्वाधिक रन्स केले होते

7/7

आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकली तर गंभीरसोबतच सचिन तेंडुलकर, रॉबिन उथप्पा आणि अजिंक्य रहाणे यांनीही चांगली कामगिरी केली आहे. सचिनने 2010 मध्ये सर्वाधिक रन्स केले होते. तर उथप्पाने 2014 मध्ये तर रहाणेने 2015 मध्ये हा पराक्रम केला होता.