Kingdom Of Eswatini: राजाला १५ राण्या आणि कपडे न घालता मुलींची व्हर्जिन परेड

Dec 24, 2020, 22:32 PM IST
1/5

दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलचे जवळजवळ २०० रूम्स बूक

भारतात त्यांनी भारत-आफ्रिका शिखर संमेलनमध्ये सहभाग घेतला

राजा मस्वाती तृतीय २०१५ साली भारतात आले होते. भारतात त्यांनी भारत-आफ्रिका शिखर संमेलनमध्ये सहभाग घेतला होता. या दरम्यान त्यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत चर्चा केली होती, भेट घेतली होती. राजा मस्वाती तृतीय यांच्यासोबत त्यांच्या १५ पत्नी, मुलं आणि १०० नोकर देखील होते. या सर्व लोकांसाठी दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलचे जवळजवळ २०० रूम्स बूक करण्यात आले होते.

2/5

राजाचं मुलीवर मन येतं, तिच राजाची राणी

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 'उम्हलांगा सेरेमनी' फेस्टिवल

एस्वातिनी आपल्या आगळ्यावेगळ्या परंपरेसाठी देखील ओळखलं जातं. येथे प्रत्येक वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 'उम्हलांगा सेरेमनी' फेस्टिवल’ असतो. या फेस्टिवलमध्ये १० हजार पेक्षा जास्त अविवाहीत मुली सहभाग घेतात. तसेच राजा आणि प्रजेसमोर बिनाकपड्याचं नृत्य करतात. ज्या राजाचं मुलीवर मन येतं, तिच राजाची राणी होते.

3/5

राजा मस्वाती तृतीय हे एक ऐशआरामी आणि मजेत जगणारा राजा म्हणून चर्चेत

मजेत जगणारा राजा म्हणून चर्चेत

राजा मस्वाती तृतीय हे एक ऐशआरामी आणि मजेत जगणारा राजा म्हणून चर्चेत राहिले आहेत. राजा मस्वाती यांना एक नाही, दोन नाही, तर १५ राण्या आणि ३० मुलं आहेत. यापेक्षाही आणखी आश्चर्यकारक म्हणजे, राजा मस्वाती यांचे वडील सोभुजा यांना १२५ राण्या होत्या. राजा मस्वाती यांची गणना जगातील श्रीमंत राजांमध्ये केली जाते. या राजांची संपत्ती २०० मिलियन अब्ज डॉलर इतकी आहे. आपल्या राण्यांसाठी त्यांनी १३ अलिशान महल बनवले. या महलाचं सौंदर्यं अतिशय आकर्षित करणार आहे.

4/5

एस्वातिनी जगातील सर्वात गरीब देशांमध्ये समावेश असलेला देश

६५ टक्के लोक गरीब

एस्वातिनी जगातील सर्वात गरीब देशांमध्ये समावेश असलेला देश आहे, येथे अजूनही राजेशाही आहे. येथे राजा मस्वाती तृतीय यांची सत्ता आहे. येथील जनतेला नीट खायला मिळत नाही, येथे प्रचंड गरीबी आहे. या देशात १३ लाख लोक राहतात. यातील ६३ टक्के लोक हे गरीब आहेत. मात्र येथील राजा मस्वाती तृतीय यांचं जीवन अतिशय ऐशआरामात गेलं.

5/5

डलामिनी हे १ डिसेंबरला कोरोनाने संक्रमित

एस्वातिनी देशाचे पंतप्रधान (Kingdom Of Eswatini) एम्ब्रोस डलामिनी

दक्षिण आफ्रिकाच्या (South Africa) एस्वातिनी देशाचे पंतप्रधान (Kingdom Of Eswatini) एम्ब्रोस डलामिनी (Ambrose Dlamini) यांचं १३ डिसेंबर २०२० रोजी कोरोना संक्रमणाने निधन झालं. ते कोरोनाने (Corona Virus) संक्रमित होते. डलामिनी हे १ डिसेंबरला कोरोनाने संक्रमित झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना हॉस्रिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या राजाशी संबंधित काही मजेदार गोष्टी आहेत. एस्वातिनीचा (Kingdom Of Eswatini) राजा मस्वाती  (Mswati 3)तृतीय यांच्याशी संबंधित काही मजेदार गोष्टी...