New Rules: 1 ऑगस्टपासून बदलतील 'हे' नियम, तुमचे दैनंदिन जीवनावर दिसेल परिणाम

जुलै महिना संपून आता ऑगस्ट महिना सुरु होईल. दरम्या 1 ऑगस्टपासून तुमच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित काही महत्वाचे बदल तुम्हाला पाहाला मिळणार आहेत. मुदत ठेवी, आयटीआर फाइलिंग आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. ऑगस्ट महिन्यातही 14 दिवस बँकांना सुट्या आहेत. रक्षाबंधन, मोहरम आणि इतर अनेक सणांमुळे विविध राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. बँकेच्या शाखेत कोणतेही काम करायचे असल्यास ते आधी करणे चांगले. याबद्दल सविस्तर जाणू घेऊया.  

| Jul 30, 2023, 15:00 PM IST

Financial Rules: जुलै महिना संपून आता ऑगस्ट महिना सुरु होईल. दरम्या 1 ऑगस्टपासून तुमच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित काही महत्वाचे बदल तुम्हाला पाहाला मिळणार आहेत. मुदत ठेवी, आयटीआर फाइलिंग आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. ऑगस्ट महिन्यातही 14 दिवस बँकांना सुट्या आहेत. रक्षाबंधन, मोहरम आणि इतर अनेक सणांमुळे विविध राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. बँकेच्या शाखेत कोणतेही काम करायचे असल्यास ते आधी करणे चांगले. याबद्दल सविस्तर जाणू घेऊया.  

1/8

1 ऑगस्टपासून बदलतील हे नियम, तुमचे दैनंदिन जीवनावर दिसेल परिणाम

New Rules From August 2023 affect on daily life

Financial Rules: जुलै महिना संपून आता ऑगस्ट महिना सुरु होईल. दरम्या 1 ऑगस्टपासून तुमच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित काही महत्वाचे बदल तुम्हाला पाहाला मिळणार आहेत. मुदत ठेवी, आयटीआर फाइलिंग आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. 

2/8

14 दिवस बँकांना सुट्या

New Rules From August 2023 affect on daily life

ऑगस्ट महिन्यातही 14 दिवस बँकांना सुट्या आहेत. रक्षाबंधन, मोहरम आणि इतर अनेक सणांमुळे विविध राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. बँकेच्या शाखेत कोणतेही काम करायचे असल्यास ते आधी करणे चांगले. याबद्दल सविस्तर जाणू घेऊया.  

3/8

गॅसच्या दरात बदल

New Rules From August 2023 affect on daily life

ऑगस्ट महिन्यापासून गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमती बदलू शकतात. या कंपन्या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला एलपीजीची किंमत बदलतात. पीएनजी आणि सीएनजीच्या दरातही बदल होऊ शकतो.

4/8

आयटीआर दाखल करणे

New Rules From August 2023 affect on daily life

आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. या तारखेपर्यंत आयटीआर दाखल न केल्यास दंड भरावा लागेल. करासह दंडही भरावा लागणार आहे. आयटीआर उशीरा भरल्यास करदात्यांना 5,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

5/8

14 दिवस बँका बंद

New Rules From August 2023 affect on daily life

ऑगस्ट महिन्यात तुमचे बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम असेल तर लक्षात ठेवा या महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहतील. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.

6/8

IDFC बँक एफडी

New Rules From August 2023 affect on daily life

IDFC बँकेने 375 दिवस आणि 444 दिवसांसाठी अमृत महोत्सव मुदत ठेव योजना सुरू केली आहे. यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट आहे. 375 दिवसांच्या FD वर कमाल 7.60 टक्के व्याज आहे. 444 दिवसांच्या FD वर कमाल व्याज 7.75 टक्के आहे. 

7/8

अमृत कलश योजना

New Rules From August 2023 affect on daily life

SBI च्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२३ आहे. ही 400 दिवसांची विशेष एफडी योजना योजना आहे, ज्यामध्ये सामान्य लोकांना 7.1 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याजदर मिळेल.

8/8

खरेदीवर परिणाम

New Rules From August 2023 affect on daily life

जर तुम्ही अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. अॅक्सिक बॅंक आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करणाऱ्या लोकांना आता 12 ऑगस्टपासून क्रेडिट कार्डच्या खरेदीवर कमी कॅशबॅक मिळेल.