WhatsApp युजर्संसाठी वाईट बातमी; फोटो अन् व्हिडिओंच्या बॅकअपसाठी द्यावे लागणार पैसे

जर तुम्ही अँड्रॉइड यूजर असाल आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. गुगल आणि व्हॉट्सअ‍ॅपने तुमच्या चॅट आणि मीडिया बॅकअपसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. नवीन नियमानुसार आता व्हॉट्सअॅप चॅटही गुगल स्टोरेजचा भाग असणार आहे.

Nov 16, 2023, 17:29 PM IST
1/7

whatsapp users

युजर्ससाठी ही खास गोष्ट नसून ही समस्या आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर, ज्यांचे व्हॉट्सअॅप बॅकअप खूप जास्त अशा अनेक युजर्संना समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.  कारण गुगलकडून मोफत मिळणारे 15 जीबीचे स्टोरेज कदाचित अपुर पडण्याची शक्यता आहे.

2/7

whatsapp update

Google आणि WhatsApp ने घोषणा केली आहे की डिसेंबर 2023 पासून, व्हॉट्सअॅप बॅकअप हा गुगलने दिलेल्या 15 जीबी विनामूल्य स्टोरेजचा भाग असणार आहे. पण तुमचा डेटा 15 GB पेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला काही डेटा डिलीट करावा लागेल किंवा त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील.  

3/7

google account

गुगल अकाऊंट तयार केल्यावर, युजर्सना 15 GB स्टोरेज मिळते. अँड्रॉइड युजर गुगल फोटो, जीमेल आणि त्यांच्या फोनचा बॅकअप घेण्यासाठी या स्टोरेजचा वापर करू शकतात. यासोबत यूजर्सना व्हॉट्सअॅप बॅकअपची सुविधाही मिळणार आहे.

4/7

google backup

व्हॉट्सअॅपचा बॅकअप गुगल ड्राईव्हमध्ये जातो. मात्र आतापर्यंत तो गुगल स्टोरेजमध्ये जोडला गेला नव्हता. म्हणजे गुगलने तशी व्यवस्था केली होती. नाहीतर संपूर्ण 15 जीबी डेटा व्हॉट्सअॅपचा जमा झाला असता.

5/7

whatsapp backup

पण आता ज्या युजर्सचा व्हॉट्सअॅप बॅकअप खूप जास्त आहे त्यांना नवीन नियमामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. जर 5 जीबी डेटा व्हॉट्सअॅपसाठी असेल आणि 14 जीबी फोटोंसाठी असेल तर समस्या निर्माण होऊ शकते.

6/7

data storage

असे असल्यास फोनचा डेटा डिलीट करावा लागेल किंवा गुगलवरून अतिरिक्त स्टोरेज खरेदी करुन दरमहा किमान 130 रुपये खर्च करावे लागतील. 130 रुपये महिन्याला भरुन युजरला 100 GB डेटा मिळेल.  

7/7

WhatsApp Beta

नवीन नियम पुढील महिन्यापासून व्हॉट्सअॅप बीटा युजर्ससाठी आणि पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सामान्य युजर्संसाठी लागू केला जाईल.