Nirmala Sitharaman Biography : पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमण किती शिकल्या आहेत माहितीये?

Nirmala Sitharaman Biography  :  एक कणखर व्यक्तीमत्त्वं अशी निर्मता सीतारमण यांची ओळख. स्पष्टवक्तेपणासाठी त्या कायमच ओळखल्या जातात. शिवाय त्यांच्या वागण्याबोलण्यातून दिसणारा हजरजबबाबीपणाही कायमच नजरा वळवतो. 

Jan 31, 2023, 14:34 PM IST

Nirmala Sitharaman Biography : केंद्र सरकारकडून यंदाचा म्हणजेच 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी नागरिकांपासून राजकीय नेतेमंडळी आणि व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच काही प्रश्न पडत आहेत. यातल्या काही प्रश्नांची उत्तरंही त्यांना मिळत आहे. यामध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याबाबत कुतूहलपूर्ण प्रश्न विचारणाऱ्यांची संख्याही कमी नाही. (Budget 2023 Who is nirmala sitharaman know about her education and other details ) 

 

1/7

nirmala sitharaman 5 th budget

Budget 2023 Who is nirmala sitharaman know about her education and other details

निर्मला सीतारमण यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 मध्ये तामिळनाडूतील मदुराई येथे झाला होता. नारायण सीतारमण असं त्यांच्या वडिलांचं नाव. तर, सावित्री असं त्यांच्या आईचं नाव.   

2/7

nirmala sitharaman finance minister

Budget 2023 Who is nirmala sitharaman know about her education and other details

दक्षिण भारतातच निर्मला सीतारमण यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. ज्यानंतर त्यांनी सीतालक्ष्मी रामस्वामी महाविद्यालय, तिरुचिरापल्ली येथे अर्थशास्त्रातून बीएपर्यंतचं पदवी शिक्षण घेतलं.   

3/7

nirmala sitharaman budget 2023

Budget 2023 Who is nirmala sitharaman know about her education and other details

पदवीनंतर त्या दिल्लीमध्ये आल्या आणि इथून त्यांनी जवाहरलाल विश्वविद्यालयातून अर्थशास्त्रातून एमए आणि एमफिल पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.

4/7

nirmala sitharaman education

Budget 2023 Who is nirmala sitharaman know about her education and other details

फार कमीजणांना याची कल्पना असेल, की देशाच्या अर्थमंत्री असण्यासोबतच सीतारमण एक अर्थतज्ज्ञही आहेत. शिवाय समाजसेवेतही त्या मोलाचा सहभाग दर्शवतात. 

5/7

nirmala sitharaman

Nirmala Sitharaman Biography : Know the Unknown Fact About Nirmala Sitharaman Education Networth Family and more Budget 2023

2014 पासून राज्यसभेत दिसणाऱ्या सीतारमण देशाच्या संरक्षण मंत्रीसुद्धा होत्या. शिवाय अर्थ आणि कॉर्पोरेट क्षेत्रांशी संबंधित खात्यांवर त्या राज्यमंत्री म्हणूनही सेवेत होत्या. 

6/7

Budget

Budget 2023 Who is nirmala sitharaman know about her education and other details

2006 मध्ये त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आणि 2010 मध्ये त्यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता या पदाची धुरा सोपवण्यात आली. 

7/7

Budget 2023

Budget 2023 Who is nirmala sitharaman know about her education and other details

2014 जून महिन्यात त्या आंध्रप्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेल्या. मे 2016 मध्ये त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कर्नाटक जागेवरून विजय मिळवला होता. आतापर्यंत त्यांनी जवळपास 4 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला असून, ही अर्थसंकल्प सादर करण्याची त्यांची पाचवी वेळ आहे.