आशियातील सर्वात लांब 'ह्या' बोगदा प्रकल्पाची नितीन गडकरी यांच्याकडून पाहणी

Zojila Tunnel Project: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: या प्रकल्पाची पाहणी केली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी या क्षणांचे काही फोटो आणि प्रकल्पाची माहितीसुद्धा दिली.   

Apr 11, 2023, 17:13 PM IST

Zojila Tunnel Project: मागील काही वर्षांमध्ये देशाचा बहुतांश भाग रस्तेमार्गानं जोडण्याचे प्रकल्प प्राधान्यानं हाती घेण्यात आले आणि ते प्रकल्प पूर्णत्वासही जाताना दिसते. असाच एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या जम्मू काश्मीरमध्ये सुरु असून, सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

1/8

Nitin Gadkari

Nitin Gadkari shares photos of Asias Longest Highest Zojila Tunnel Jammu Kashmir

Nitin Gadkari Zojila Tunnel Visit: केंद्रीय परिवहन मंत्री यांच्या नेतृत्त्वाखाली एक समिती जोजिला बोगद्याच्या पाहणीसाठी पोहोचली. यावेळी जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हासुद्धा उपस्थित होते.   

2/8

Asias Longest Highest Zojila Tunnel

Nitin Gadkari shares photos of Asias Longest Highest Zojila Tunnel Jammu Kashmir

सल्लागार समितीसह बोगद्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर गडकरींनी माध्यमांशी संवाद साधला.   

3/8

Asias Longest Zojila Tunnel

Nitin Gadkari shares photos of Asias Longest Highest Zojila Tunnel Jammu Kashmir

हा प्रकल्प म्हणजे एक ऐतिहासिक योजना असून काश्मीरला कन्याकुमारीशी जोडू पाहणाऱ्या एका सुरेख स्वप्नाचाच एक महत्त्वाचा भाग आहे, असं गडकरी म्हणाले. 

4/8

Zojila Tunnel

Nitin Gadkari shares photos of Asias Longest Highest Zojila Tunnel Jammu Kashmir

समुद्रसपाटीपासून 11500 फूट उंचीवर असणारा हा बोगदा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा बोगदा असल्याचंही ते म्हणाले. 

5/8

Zojila Tunnel Jammu Kashmir

Nitin Gadkari shares photos of Asias Longest Highest Zojila Tunnel Jammu Kashmir

श्रीनगर- करगिल- लेहला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असणारा हा बोगदा जोजिलापासून पुढे जाईल. 

6/8

Jammu Kashmir

Nitin Gadkari shares photos of Asias Longest Highest Zojila Tunnel Jammu Kashmir

थंडीच्या दिवसांमध्ये राष्ट्रीय महामार्गावर बर्फवृष्टीमुळं वाट बंद होते अशा परिस्थितीत लडाख आणि काश्मीरच्या खोऱ्याशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटतो. तिथंच हा बोगदा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 

7/8

Zojila Tunnel photos

Nitin Gadkari shares photos of Asias Longest Highest Zojila Tunnel Jammu Kashmir

हा बोगदा काश्मीरमध्ये असणाऱ्या बालताल भागाला लडाखच्या कारगिलमधील द्रासशी एका लघु मार्गानं जोडेल.   

8/8

jammu kashmir

Nitin Gadkari shares photos of Asias Longest Highest Zojila Tunnel Jammu Kashmir

सध्याच्या घडीला या बोगद्याचं 38  टक्के काम पूर्ण झालं असून, या प्रकल्पाच्या एका भागाचं उदघाटन यंदाच्या वर्षीच करण्यात येणार असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं.