Mahatma Phule Jayanti 2023: महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त द्या 'हे' खास शुभेच्छा संदेश..

Jyotiba Pule Birth Anniversary : महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणारे, समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

Apr 11, 2023, 17:02 PM IST

Mahatma Phule Jayanti 2023 Messages in Marathi : तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

"प्रवाहाच्या विरुध्द दिशेला तेच पोहू

शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात.
ज्यांना कुठलेतरी उध्दिष्ट गाठायचे
असते ."

मुली आणि दलितांसाठी पहिली शाळा उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. आज सोशल मीडियाच्या जगात Whatsapp Status आणि इन्स्टाग्राम स्टेट्सला ठेवण्यासाठी खास मराठीतील शुभेच्छा आज आम्ही 

1/7

स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो कधी जातीचा तर कधी धर्माचा  धर्म महत्त्वाचा नाही  माणुसकी असली पाहिजेल

2/7

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे, बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत… क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

3/7

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

4/7

सत्यशोधक समाजचे संस्थापक, महान विचारक व दलित चिंतक महात्मा ज्योतिबा फुले जी च्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

5/7

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

6/7

“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।” महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

7/7

१९ व्या शतकातील महान विचारवंत, समाजसेवक व महिला आणि दलितांच्या उत्कर्षाचे प्रबल समर्थक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ।