₹20000000000 चा प्रोजेक्ट रतन टाटांनी 'त्या' एका शब्दाच्या SMS मुळे गुजरातला हलवला! मोदींचा खुलासा
Modi One Word SMS To Ratan Tata: रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासोबतचे काही खास फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच त्यांच्यासोबत झालेल्या पूर्वीच्या संवादाच्या आठवणींनाही उजाळा दिला. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या एका मेसेजच्या आधारे रतन टाटांनी फार मोठा निर्णय घेतलेला. त्याचबद्दल जाणून घेऊयात...
1/11
2/11
3/11
मोदींनी रतन टाटांबरोबर काही फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “रतन टाटा हे एक दूरदर्शी असणारं व्यापारी नेतृत्व होतं. एक उत्तम दयाळू व्यक्तीमत्त्व आणि विलक्षण माणूस आज आपल्यातून गेला. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्याला स्थिर नेतृत्व दिले. त्यांचं एकंदरित योगदान बोर्डरूमच्या पलीकडचे होते," असं मोदी म्हणाले.
4/11
"विनम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्यासाठी त्यांच्याकडे असलेली अतूट बांधिलकी या गुणांमुळे रतन टाटा प्रचंड लोकप्रिय झाले. रतन टाटा यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आवड होती. शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण यासारख्या अनेक गोष्टींमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी ते कायमच आघाडीवर होते. रतन टाटा यांच्याशी झालेल्या असंख्य संवादांच्या आठवणीने आता माझे मन भरून आले आहे," असंही मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले.
5/11
6/11
खरं तर पंतप्रधान मोदी यांनी खरोखरच आपल्या एका शब्दाच्या जोरावर रतन टाटांना गुजरातमध्ये जगातील सर्वात परवडणाऱ्या कारचा म्हणजेच नॅनोचा कारखाना उभारण्यासाठी आमंत्रित केलं होतं. हा सारा प्रकार 2008 साली घडला जेव्हा टाटा समुहाला पश्चिम बंगालमधील टाटा नॅनोचा प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे गुंडाळावा लागला.
7/11
8/11
9/11
"जेव्हा रतन टाटांनी कोलकात्यामधील पत्रकार परिषदेमध्ये ते पश्चिम बंगाल सोडत असल्याची घोषणा केली. तेव्हा त्यांना मी एक छोटा मेसेज पाठवला. ज्यामध्ये केवळ 'वेलकम' असं लिहिलेलं होतं. आता तुम्ही पाहू शकता की 1 रुपयाच्या एसएमएसने काय होऊ शकतं," असं खुद्द मोदी यांनीच 2010 साली सांदण येथील टाटा नॅनोच्या प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी म्हटलं होतं. हा प्रकल्प 2000 कोटींची गुंतवणूक करुन उभारला होता.
10/11