एकेकाळी होता समुद्र; असा निर्माण झाला पृथ्वीवरील ग्रेट हिमालय पर्वत

हिमालय पर्वत ही सर्वात मोठी पर्वत रांग आहे. हिमालय पर्वताच्या निर्मीती कशी झाली जाणून घेवूया. 

Oct 05, 2023, 22:11 PM IST

The Great Himalaya mountain Range : ग्रेट हिमालय पर्वत हा पृथ्वीवरील सर्वात विशाल पर्वत आहे. मात्र, या हिमालय पर्वताच्या जागी एकेकाळी महाकाय समुद्र होता. जाणून घेवूया कसा निर्माण झाला  पृथ्वीवरील ग्रेट हिमालय पर्वत.

1/7

हिमालयाची निर्मिती 4.70 कोटी वर्षांंपूर्वीची असल्याचा दावा अनेक संशोधक करतात.

2/7

हिमालय ही आशिया खंडात पसरलेली, जगातील सर्वांत उंच पर्वतरांग आहे.

3/7

4.70 कोटी वर्षांपूर्वी भारतीय व युरेशियन प्लेटस एकमेकांवर आदळल्या तेव्हा हिमालयाची निर्मिती झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.  

4/7

हिमालय पर्वतच्या जागी टेथीस समुद्र होता.    

5/7

 टेथीस समुद्राच्या तळावरील गाळाच्या खडकांवर पडलेल्या दाबामुळे तो भाग उंचावत गेला.  

6/7

स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात प्लँक्टनचं (समुद्रात तरंगणारे जीव) रुपांतर एका चिकट पदार्थांमध्ये झालं. ज्यामुळे खडक एकमेकांना चिकटून विशालकाय पर्वत उभे राहिले.  

7/7

 हिमालय पर्वत रांगेत 15 हजारपेक्षा जास्त हिमनद्या आहेत.