Oscars 2023: ऑस्कर पुरस्कार जिंकणारं "Naatu Naatu" गाणं कसं तयार झालं? जाणून घ्या

95th Academy Awards 2023: एस एस राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील 'Naatu Naatu' या गाण्याने ऑस्कर 2023 मध्ये इतिहास रचला आहे. नाटू- नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग (Best Original Songs) या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 15 गाण्यांमधून नाटू नाटू हे गाणे सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार 2023 च्या सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत निवडले गेले आहे.

Mar 13, 2023, 11:39 AM IST

नाटू - नाटूने (Natu Natu) ऑस्कर (Oscar 2023) जिंकल्यानंतर जगभरातून आरआरआरच्या (RRR) संपूर्ण टीमचे कौतुक करण्यात येत आहे. 'नाटू-नाटू'साठी पुरस्कार जाहीर होताच ज्युनियर एनटीआर, रामचरण आणि राजामौली यांनी एकमेकांना मिठी मारली. हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

 

1/7

Natu Natu Oscar 2023

नाटू - नाटू गाणं रिलीज झाल्यापासून जगभरात त्याने आपली छाप सोडली आहे. या गाण्यावर लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत सर्वच जण थिरकले आहेत. आता या गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकून भारताची मान उंचावली आहे.

2/7

natu natu telugu song

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संगीतकार एम. एम. किरावानी यांनी सांगितले होते की, राजमौली यांनी मला सांगितले की, एक असं गाणं हवं आहे ज्यामध्ये दोन्ही कलाकार एकमेकांशी स्पर्धा करतील. त्यानंतर किरावानी यांनी तेलुगू गीतकार चंद्रबोस यांना हे गाणे लिहिण्यासाठी निवडले.

3/7

natu natu song history

किरावानी यांनी चंद्रबोस यांना सूचना केली होती की हे गाणं लिहीताना दोन्ही कलाकारांच्या त्यावर छाप असायला हवी. तसेच हा चित्रपट 1920 मध्ये घडलेल्या घटनांभोवती असल्याने गाणे त्याच्याशी संबधित असायला हवं.

4/7

chandrabose

राजामौली, किरावानी आणि चंद्रबोस यांनी 17 जानेवारी 2020 पासून या गाण्यावर काम करण्यास सुरुवात केली होती. गाडी चालवत असताना चंद्रबोस यांच्या मनात 'नाटू-नाटू' गाण्याची हुक लाईन चमकली.

5/7

natu natu song

दोन दिवसांनी चंद्रबोस यांनी गाण्याची तीन कडवी तयार केली आणि किरावानी यांची भेट घेतली. चंद्रबोस यांनी त्यांचे आवडते कडवे सर्वात शेवटी आणि दोन कडवी आधी ऐकवली.

6/7

natu natu dance steps

 90 टक्के गाणे दोन दिवसांत लिहून पूर्ण झालं होतं. पण काही बदलांमुळे ते पूर्ण होण्यास 19 महिने लागले आणि गाणे तयार झाले. चंद्रबोस आणि किरावानी या गाण्यावर अनेक वेळा चर्चा देखील केली.

7/7

natu natu singer

तेलगूमधल्या अनेक लोककथांचा आणि त्यातील पात्रांचा या गाण्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. हे गाणे कालभैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी गायले आहे.