PAK vs ENG : पराभवापासून वाचण्यासाठी दुखापतग्रस्ती खेळाडूला उतरवलं मैदानात, पण...!

PAK vs ENG : पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात खेळल्या जात असलेल्या टेस्ट सिरीजचा (PAK vs ENG, 1st Test) पहिला सामना रावलपिंडी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने यजमान पाकिस्तानचा 74 धावांनी धुव्वा (England Defeat Pakistan By 74 Runs) उडवला आहे. या सामन्यातील अखेरचा दिवस सर्वात थरारक राहिला. कॅप्टन बेन स्टोक्सने (Ben Stokes) मोठा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला त्यांच्याच जाळ्यात फसवलं.

Dec 05, 2022, 21:56 PM IST
1/5

पाकिस्तान क्रिकेट टीमला इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. रावळपिंडीमध्ये पहिली टेस्ट खेळवली गेला ज्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

2/5

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज राऊफ दुसऱ्या टेस्ट सामन्यातून बाहेर पडलाय. पहिल्या टेस्ट सामन्यात राऊफला दुखापत झाली होती. त्यामुळे तो दुसरा सामना खेळू शकणार नाही.

3/5

पहिल्या कसोटी सामन्यातून राउफने टेस्टमध्ये पदार्पण केले. फिल्डींग करताना त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली.

4/5

राउफच्या पायाला दुखापत झाली असून त्याला एमआरआयसाठी पाठवण्यात आलं. मात्र आता तो उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्याने पहिल्या डावात फलंदाजी केली. मात्र दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी केली नाही. दुखापत झाली असूनही तो फलंदाजीला आला होता.

5/5

राऊफ हा दुखापतग्रस्त झालेला दुसरा पाकिस्तानी गोलंदाज आहे. यापूर्वी शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे सिरीजमधून बाहेर झाला आहे.