औक्षण, पेढा अन् गळाभेट... धनंजय मुंडे पंकजांबरोबरचे फोटो शेअर करत म्हणाले, "बहीण-भावाचे..."

Pankaja Munde Dhananjay Munde Celebration: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी अवघ्या काही तासांमध्ये राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या 9 नेत्यांमध्ये धनंजय मुंडेचाही समावेश आहे. याच धनंजय मुंडेंनी बहीण पंकजा मुंडेंबरोबर शेअर केलेल्या काही फोटोंनी आता अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंची कॅप्शनही चांगलीच चर्चेत आहे. काय म्हणाले आहेत धनंजय मुंडे पाहूयात...

Jul 07, 2023, 11:16 AM IST
1/9

Pankaja Munde Dhananjay Munde Celebration

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर बंडखोरी करणाऱ्या आमदारांमध्ये बीडचे आमदार धनंजय मुंडेचाही समावेश आहे.

2/9

Pankaja Munde Dhananjay Munde Celebration

धनंजय मुंडेंनी रविवारी (2 जुलै 2023) राजभवनामध्ये पार पडलेल्या शपथविधीमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.

3/9

Pankaja Munde Dhananjay Munde Celebration

धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2019 च्या बंडाच्या वेळेसही त्यांनी अजित पवारांना साथ दिली होती. आता शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याच्या अजित पवारांच्या निर्णयामध्येही ते अजितदादांसोबत आहेत.

4/9

Pankaja Munde Dhananjay Munde Celebration

धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची चुलत बहीण आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची काय भूमिका घेतील याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात होती.

5/9

Pankaja Munde Dhananjay Munde Celebration

मात्र आजच धनंजय मुंडेंनी आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये पंकजा मुंडे धनजंय यांना ओवाळताना दिसत आहे.

6/9

Pankaja Munde Dhananjay Munde Celebration

या फोटोंमध्ये पंकजा मुंडे धनंजय यांचं औक्षण करताना दिसत आहेत. एका फोटोत पंकजा धनंजय यांना पेढा भरवताना दिसून येत आहे. तर अन्य एका फोटोमध्ये पंकजा यांना पुष्पगुच्छ देऊन धनंजय यांनी त्यांचे आभार मानल्याचं पहायला मिळत आहे.

7/9

Pankaja Munde Dhananjay Munde Celebration

राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या, असं हे फोटो शेअर करताना धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

8/9

Pankaja Munde Dhananjay Munde Celebration

भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मी ही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, असंही धनंजय मुंडेंनी म्हटलंय. धनंजय मुंडेंनी पंकजा यांना भावूक होऊन गळाभेट घेतल्याचंही दिसून येत आहे.

9/9

Pankaja Munde Dhananjay Munde Celebration

आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे, असंही धनंजय यांनी फोटो कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.