पवन कल्याणच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग! 12 वर्ष जुन्या चित्रपटाच्या री-रिलीजन केला धिंगाना

दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याणचे लाखो चाहते आहेत. त्याचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पवन कल्याणचा 2012 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट एका थिएटरच्या मालकानं पुन्हा प्रदर्शित केला आहे. हा निर्णय थिएटर मालकाला खूप महागात पडला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.   

| Feb 10, 2024, 17:28 PM IST
1/7

पवन कल्याण

अभिनेता पवन कल्याणविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याचे लाखो चाहते आहेत. 

2/7

पवनचा 2012 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट

2012 मध्ये पवन कल्याण दिग्दर्शत 'कैमरामैथन गंगाथो रामबाबू' हा चित्रपट नंदयालाच्या थिएटर मालकानं पुन्हा एकदा प्रदर्शित केलं आहे. 

3/7

थिएटर मालकाला हा निर्णय पडला महागात

थिएटर मालकाला तो चित्रपट पुन्हा एकदा दाखवण्याचा निर्णय महागात पडला आहे. पवन कल्याणच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. 

4/7

चाहत्यांना घातला धिंगाना

पवन कल्याणच्या चाहत्यांनी चित्रपट री-रिलीज होताच थिएटरमध्ये कागदाचे तुकडे जाळले आहेत. त्याशिवाय डान्स देखील केला आहे. 

5/7

एकमेकांना केले प्रोत्साहित

न्यूज एजंसी ANI नं शेअर केलाय हा व्हिडीओत. त्याशिवाय त्यांनी मोठ्या मोठ्यानं पवन कल्याणचं नाव घेत एकमेकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे.   

6/7

तक्रार दाखल झाली?

दरम्यान, अजून याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही की त्या सगळ्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे की नाही. 

7/7

चाहत्यांनी आधीही केली तोडफोड

पवन कल्याणच्या चाहत्यांनी या आधी देखील अशी तोडफोड केली आहे. 2021 मध्ये त्याचा एक चित्रपट टेक्निकल एररमुळे मध्येच थांबवण्यात आला होता. तर चाहत्यांनी जोगुलम्बा गडवालच्या एका थिएटरमध्ये तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्याशिवाय 2023 मध्ये देखील त्यांनी असं केलं होतं. (All Photo Credit : Social Media)