Airtel, Jio आणि Viमध्ये कांटे की टक्कर

जाणून घेवू कोणती कंपनी ग्राहकांना चांगली सेवा देत आहे.

Nov 05, 2020, 13:15 PM IST

प्रिपेड ग्राहकांसाठी मोबाईल रिचार्ज करण्याआधी संबंधील ऑफर काय आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. Airtel, BSNL, Jio आणि  Vi या चार मोठ्या कंपन्या ग्रहकांना ८४ दिवसांसाठी प्लान ऑफर करत आहेत. त्यामुळे जाणून घेवूया कोणती कंपनी ग्राहकांना चांगली सेवा देत आहे. 

1/4

Airtel

Airtel

Airtel च्या या प्लानची वैधता ८४ दिवसांसाठी आहे. ज्यामध्ये दररोज 1.5 जीबी डेटा असणार आहे. अनलिमिटेड कॉल आणि रोज १०० मेसेजची सुविधा देण्यात आली आहे. 

2/4

BSNL

BSNL

आता इतर टेलीकॉम कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये BSNLने देखील उडी घेतली आहे. BSNLने देखील ८४ दिवसांचा प्लान लाँच केला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना १ जीबी डेटा मिळणार आहे. शिवाय अनलिमिटेड कॉल आणि फ्री रोमिंग आहे. रोज १०० मेसेजची सुविधा देण्यात आली आहे. 

3/4

Vi (Vodafone-Idea)

Vi (Vodafone-Idea)

Vi (Vodafone-Idea) देखील ८४ दिवसांची सेना ग्राहकांना देत आहे. त्यामध्ये  1.5 जीबी डेटा असणार आहे. शिवाय कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सेवा देण्यात आली आहे.   

4/4

Jio

Jio

Jio च्या या प्लानची वैधता ८४ दिवसांसाठी आहे. ज्यामध्ये दररोज 1.5 जीबी डेटा असणार आहे. त्याचप्रमाणे Jio to Jio अनलिमिटेड कॉलिंग, अन्य नेटवर्कवर केल्यास ३ हजार मिनिट्स आणि रोज १०० मेसेजची सुविधा देण्यात आली आहे. शिवाय Jio ऍप्सचचं फ्री सब्सक्रिप्शन देखील ग्राहकांना मिळणार आहे.