मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत? महत्वाची अपडेट आली समोर

Mumbai Ahmedabad Bullet Train Lates Updates: वांद्रे येथील मुंबई हायस्पीड रेल्वे स्थानकावर 36 मीटर खोलीवर शाफ्ट-1 बांधण्यात येत असून तेथे दुसऱ्या पायलिंगचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून खोदकाम सुरु आहे. 

| Feb 09, 2024, 10:51 AM IST
1/9

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत? महत्वाची अपडेट समोर

Mumbai Ahmedabad Bullet Train India Progress

Bullet Train India Progress: देशात पहिल्या बुलेट ट्रेनची वाट पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. ​​नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने बुलेट ट्रेन संदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. येथे  टर्मिनस आणि समुद्राखालील 21 किमी लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

2/9

मध्यवर्ती बोगद्याचे पोर्टल

Mumbai Ahmedabad Bullet Train India Progress

बुलेट ट्रेनसाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिळफाटा दरम्यान समुद्राखालून सात किलोमीटरचा तर ठाण्यात 21 किलोमीटर लांबीचा सिंगल ट्रॅक बोगदा बांधला जात आहे. सध्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, विक्रोळी, सावली, शिळफाटा येथील बोगद्या विभागात तीन शाफ्ट आणि एका अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्याच्या पोर्टलवर काम सुरू आहे. 

3/9

पायलिंगचे काम

Mumbai Ahmedabad Bullet Train India Progress

वांद्रे येथील मुंबई हायस्पीड रेल्वे स्थानकावर 36 मीटर खोलीवर शाफ्ट-1 बांधण्यात येत असून तेथे दुसऱ्या पायलिंगचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे.  विक्रोळीतील शाफ्ट-2 ची खोली तेवढीच 36 मीटर असून त्यात पायलिंगचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे.

4/9

दोन टनेल बोरिंग मशीन

Mumbai Ahmedabad Bullet Train India Progress

या शाफ्टचा वापर दोन टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) विरुद्ध दिशेने खाली करण्यासाठी केला जाणार आहे. यातील एक बीकेसीच्या दिशेने आणि दुसरा घणसोलीच्या दिशेने असणार आहे. सावली (घणसोलीजवळ) येथे 39 मीटर खोल शाफ्ट-3 चे खोदकाम सुरू आहे. तर शिळफाटा येथे बोगद्याच्या शेवटी पोर्टलचे काम सुरू झाले आहे.

5/9

3 टीबीएमचा वापर

Mumbai Ahmedabad Bullet Train India Progress

मुंबई मेट्रो प्रणालीप्रमाणे शहरी बोगदे खोदण्यासाठी साधारणपणे 5 ते 6 मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जात आहेत. सुमारे 16 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यासाठी तीन टीबीएमचा वापर केला जाणार आहे. तर उरलेले 5 किलोमीटर अंतर न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीद्वारे (NATM) खोदण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

6/9

मल्टिपल ब्लास्टिंग

Mumbai Ahmedabad Bullet Train India Progress

आजुबाजूच्या परिसरातील पर्यावरण आणि लोकसंख्येला कमीत कमी त्रास होईल या उद्देशाने ध्वनी-वायू प्रदूषण नियंत्रण केले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून मल्टिपल ब्लास्टिंगचा वापर करण्यात आला आहे. 

7/9

कामाचे जीपीएस ट्रॅकींग

Mumbai Ahmedabad Bullet Train India Progress

मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेल्या सामग्रीची विल्हेवाट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली केली जाते. याच्या प्रत्येक कामासाठी परवानगी, मान्यता घेतली जाते. या कामाचे जीपीएस ट्रॅकींग केले जाते अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

8/9

बॉटम-अप पद्धतीने' स्टेशन बांधणा

Mumbai Ahmedabad Bullet Train India Progress

BKC स्थानकावरील बुलेट ट्रेन टर्मिनससाठी सुमारे 4.8 हेक्टर जमीनीवर बॉटम-अप पद्धतीने' स्टेशन बांधले जाणार आहे. याचा अर्थ येथे जमिनीपासून किमान 32 मीटर खोलीचे खोदकाम सुरू होईल आणि पायापासून काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार आहे.

9/9

कामगारांची संख्या वाढणार

Mumbai Ahmedabad Bullet Train India Progress

सध्या अंदाजे येथे 681 कामगार आणि पर्यवेक्षकांची टीम प्रकल्पाच्या ठिकाणी दिवस रात्र काम करत आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्ट जसजसा पुर्णत्वास येईल तसे कामगारांची संख्या दररोज 6 हजार लोकांपर्यंत पोहोचू शकते,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.