लॉकडाऊनचे ५१ दिवस; पाहा देशभरातील परिस्थिती...
कोरोनाचा वाढता कहर...
देशभरात कोरोना व्हायरसने हाहःकार माजवला आहे. कोरोना रूग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. ही वाढ रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. पण लॉकडाऊनच्या नियमांचे पालन सर्वत्र होताना दिसले नाही. देशात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास ८० हजारांवर पोहोचली आहे. तर दोन महिन्यांमध्ये कोरोनामुळे २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. लॉकडाऊनच्या ५१ व्या दिवसाचा आढावा होवू काही फोटोंच्या माध्यमातून...