ग्रीन टी केवळ फायदेशीरच नाही तर हानिकारक देखील

जाणून घ्या ग्रीन टीचे तोटे  

Dec 30, 2020, 10:10 AM IST

ग्रीन टी शरीरास अत्यंत लाभदायक असते. अशी अनेकांची समज आहे. ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होतं. हे खरं असलं तरी ग्रीन टीचे शरीरास तोटे देखील आहेत. त्यामुळे ग्रीन टीचं सेवन अधिक करणं आरोग्यास घातक ठरू शकतं. योग्य प्रमाणात नियमित ग्रीन टी आरोग्यासाठी हितकारक ठरु शकते. मात्र गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी शरीराला अपायकारक ठरु शकते. यासाठी अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करु नये.

 

1/5

ग्रीन टीमध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते. जर तुम्ही टी जास्त प्रमाणात पित असाल तर त्याचे थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतील.   

2/5

जास्त ग्रीन टी पिण्यामुळे शरीरात लोहाची कमतरता दिसून येते.   

3/5

ग्रीन टीचे सेवन केल्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. जास्त ग्रीन टी प्यायल्यामुळे आपल्याला पोट रोग, उलट्या, निद्रानाश, अतिसार सारखे आजार येऊ शकतात.  

4/5

ग्रीन टी मध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये टॅनिन्स आहेत. यामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्या आहारामधील लोह शोषले जाऊ शकत नाही.   

5/5

जेवण झाल्यानंतर त्वरित ग्री टी न पिता साधारण तासाभराने ग्रीन टीचे सेवन करावे. ग्रीन टीचे सेवन अधिक असेल तर यामुळे दात पिवळसर दिसायला लागतात.