ऐश्वर्या रायसोबत होत असलेल्या तुलनेवर स्नेहा उल्लालचं स्पष्टीकरण
१५ वर्षांनंतर स्नेहाने पुन्हा अभिनयाला सुरूवात केली आहे.
२००५ साली प्रदर्शित झालेल्या 'लकी' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री स्नेहा उल्लालने कलाविश्वात एन्ट्री केली. अभिनय क्षेत्रात पाय ठेवताचं तिच्या नावाची चर्चा देखील फार झाली. होत असलेल्या चर्चेला कारणीभूत अभिनेता सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणं हे नसून अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत तिचं मिळतं-जुळतं रुप होतं. तर गेल्या अनेक वर्षांपासून दूर असलेली स्नेहा आता डिजिटल माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ZEE5च्या 'एक्सपायरी डेट' च्या माध्यमातून तिने पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पाय ठेवला आहे.