Women’s Day Special: महिलांच्या मुख्यभूमिका असलेले हे दमदार चित्रपट लवकरच येणार

चित्रपटसृष्टीतील महिलांची पॉवर वाढतेय, पाहा महिला केंद्रीत भूमिका असलेले हे दमदार चित्रपट कोणते

Mar 08, 2021, 16:34 PM IST

आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण महिला आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतो. आज, महिला दिनानिमित्ताने 2021 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे सिनेमा महिलांच्या जीवनावर आधारित मोठ्या पडद्यावर दाखविले जाणार आहेत. पुढील बायोपिक २०२१मध्ये प्रदर्शित होणार आहेत

1/7

'धाकड'

'धाकड'

रजनीश घई दिग्दर्शित 'धाकड' मध्ये कंगना रनौत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात कंगना एका जासूसची भूमिका साकारणार आहे, प्रेक्षक देखील या सिनेमासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटात कंगना राणौत दमदार लुकमध्ये दिसणार आहे. १ ऑक्टोबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.  

2/7

'गंगूबाई काठीयावाडी'

'गंगूबाई काठीयावाडी'

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आलिया भट्ट गंगूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. कामाठीपुरा इथल्या वैश्या व्यवसायात दबदबा असलेल्या गंगूबाईवर हा सिनेमा आधारित आहे. हा चित्रपट 30 जुलै 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.

3/7

'सायना'

'सायना'

ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावरील या चित्रपटात परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. परिणीती चोप्रानं काही वेळापूर्वी माहिती देताना सांगितले की, आज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. याआधी या सिनेमाच्या टीझर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं

4/7

'शाबाश मिठू'

'शाबाश मिठू'

भारतीय महिला वनडे कर्णधार मिताली राज यांच्या जीवनावरील ‘शबश मिठू’ या चित्रपटात तापसी पन्नू महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात मिताली राजच्या लूकची कॉपी करण्यासाठी, तापसीला जबरदस्त बदल करावा लागला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया यांनी केलं आहे.

5/7

'रश्मी रॉकेट'

'रश्मी रॉकेट'

चित्रपटामध्ये तप्सी पन्नू मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एका गावतली मुलगी रश्मीवर आधारित आहे. जी अ‍ॅथलेटिक स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे स्वप्न पाहते

6/7

'तेजस'

'तेजस'

'तेजस' चित्रपटात कंगना रनौत एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना एका महिला पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

7/7

'थलायवी'

'थलायवी'

जय जयललिता यांच्या जीवनावर आधारित  'थलायवी' सिनेमात कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून सहा वेळा काम केले होते आणि राजकारणात येण्यापूर्वी ते एक चित्रपट अभिनेत्री देखील होत्या. जयललिता यांची भूमिका कंगना राणौत साकारणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ए.एल. विजय यांनी केले आहे. हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होईल.