प्रियंका गांधींनी हाती घेतला साप

प्रियंका गांधी या गारुडी सोबत बोलताना दिसत आहेत. प्रियंका गांधी यांनी यावेळी सापांची माहिती घेतली. 

May 02, 2019, 22:01 PM IST

रायबरेली : उत्तर प्रदेशच्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी जोरदार प्रचार करत आहेत. सोनिया गांधी यांच्या मतदारसंघात प्रचार करत असताना प्रियंका गांधी या गारुडी सोबत बोलताना दिसत आहेत. प्रियंका गांधी यांनी यावेळी सापांची माहिती घेतली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवनवीन फंडे आजमावताना दिसत आहेत.  

1/5

गारुडी सोबत प्रियंका गांधींची भेट

गारुडी सोबत प्रियंका गांधींची भेट

प्रियंका गांधी मागील काही दिवसांपासून रायबरेली आणि अमेठीमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. याआधीच्या निवडणुकीत ही त्या मतदारसंघात येत होत्या. पण राजकारणात पूर्णपणे सक्रीय झाल्यानंतर त्यांचा हा दौरा आहे.

2/5

सापांबद्दल घेतली माहिती

सापांबद्दल घेतली माहिती

गारुडीने सांगितले की, ती सापांच्या मदतीने दरोरोज २०० रूपये कमवते. तिच्या अडचणी जाणून घेऊन, प्रियंका गांधी यांनी तिच्याकचे असलेल्या अन्य सापांविषयी माहिती घेतली. 

3/5

हाती घेतले साप

हाती घेतले साप

गारुडीसह गप्पा मारत प्रियंका गांधी यांनी सापाला हातात घेतले. त्यानंतर जमलेल्या जमावाने आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना साप हाती न घेण्याचा सल्ला दिला.   

4/5

सुरक्षा रक्षकांना विचारले, तुम्हाला भिती वाटते का

सुरक्षा रक्षकांना विचारले, तुम्हाला भिती वाटते का

त्यानंतर त्यांनी दुसऱ्या सापाला हातात घेतले, तेव्हा रक्षकांनी गारूडीला सापांना उचलण्यास सांगितले, त्यानंतर प्रियंका गांधी यांनी सुरक्षा रक्षकांना तुम्हाला भिती वाटते का.. असे विचारले.

5/5

६ मे रोजी होणार मतदान

६ मे रोजी होणार मतदान

लोकसभा निवडणूक २०१९ च्या टप्प्याचे मतदान पार पडले. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी पक्षांचे जोरदार शक्ती प्रदर्शन होताना दिसत आहे.