अंबानी, अदानी किंवा टाटा नाहीत, 'हा' व्यक्ती आहे देशातील सर्वात महागड्या फ्लॅटचा मालक... किंमत कोट्यवधीत

Most Expensive Flat in India : भारतातील सर्वात महागडं घरं कोणतं असा प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळेल उद्योगपती मुकेश अंबानी यांचा एंटेलिया बंगला. दक्षिण मुंबईतल्या अल्टामाऊंट रोडवर असलेल्या या अलिशान इमारतीची किंमत जवळपास 12 ते 15 हजार कोटी रुपये इतकी आहे.   

| Sep 05, 2024, 18:00 PM IST
1/8

अंबानी, अदानी किंवा टाटा नाहीत, 'हा' व्यक्ती आहे देशातील सर्वात महागड्या फ्लॅटचा मालक...

2/8

देशातल्या महागड्या घरांची जेव्हा चर्चा होते, तेव्हा पहिलं नाव समोर येतं ते एशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एंटेलियाचं. मुंबईतल्या दक्षिण भागात असलेल्या अल्टामाऊंट रोडवर अलिशान एंटेलिया इमारत असून याची किंमत जवळपास 12 ते 15 हजार कोटी रुपये इतकी आहे. 

3/8

एंटेलिया ही इमारत 27 मजल्याची असून यात अलिशान सुख-सुविधा आहेत. यात हेलीपॅड, स्विमिंग पूल, थिएटर, लक्झरी कारचं पार्किंग अशी अनेक सुविधि आहे. पण तुम्हाला माहित आहे का देशातील सर्वात महागडा फ्लॅट कोणाच्या नावावर आहे.   

4/8

मुंबईत नुकतीच देशातील सर्वात महागडा फ्लॅट विकला गेला. याची किंमत तब्बल 369 कोटी रुपये इतकी आहे. दक्षिण मुंबईतल्या मलबार हिल्सवर हा सी-फेसिंग फ्लॅट आहे. इकोनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार लोढा ग्रुपच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्सने हा अलिशान फ्लॅट तयार केला आहे. हा लोढा मालाबर सुपर लक्झरी रेसिडेंशियल अपार्टमेंट देशातील सर्वात महागडा फ्लॅट ठरला आहे  

5/8

इतका महागडा फ्लॅट मुकेश अंबानी, गौतम अदानी किंवा रतन टाटा या बड्या उद्योगपतींपैकी कोणीतरी खरेदी केला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती जेपी तपाडिया यांनी देशातील हा सर्वात महागडा फ्लॅट खरेदी केली आहे. तपाडिया कुटुंबाने लोढा मालाबर सुपर लक्झरी रेसिडेंशियल टॉवरमध्ये  26, 27 आणि 28 वा मजला खरेदी केला आहे. 

6/8

1.08 एकरमध्ये पसरलेला या फ्लॅटची खासियत म्हणजे समोर दिसणार समुद्राचा नजारा. फ्लॅटच्या ड्रॉईंग रुम आणि बेडरुममधून अरबी सागरांच्या लाटांचा खूबसूरत नजारा पाहायाला मिळतो. या अलिशान फ्लॅटचं इंटेरिअर करोडो रुपयांमध्ये आहे. ट्रिप्लेक्स अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 27,160 वर्ग फूट इतका आहे. या टॉवरचं आर्किटेक्चर हाफीज कॉन्ट्रेक्टर यांनी तयार केलं आहे. तर इंटेरिअरचं काम 'स्टूडिओ एजबी'ने बनवलं आहे.

7/8

या फ्लॅटसाटी तापडिया कुटुंबियांनी 19.07 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरलं आहे. याच टॉवरमध्ये बजाज ऑटोचे अध्यक्ष नीरज बजाज 29,30 आणि 31 व्या मजल्यावर राहातात. हा ट्रिप्लेक्स फ्लॅट त्यांनी 252.5 कोटी रुपयांना खरेदी केला होता. 

8/8

जेपी तापडिया हे देशातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. 1990 मध्ये तायंनी फेमी केअर कंपनीची स्थापना केली. आज फेमी केअर कंपनी जगातील सर्वात मोठी कॉपर-टी मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी आहे. याआधी तापडिया यांनी 2016 मध्ये मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 60 कोटी रुपयांचा  11,000 स्क्वेअर फूटचा ड्युप्लेक्स फ्लॅट खरेदी केला होता.