PHOTO: घर भाड्याने घेण्याआधी घरमालकाला नक्की विचारा 'हे' 10 प्रश्न!

Renting House Tips:भाड्यानं घर घेताना वेळीच काळजी घेतली नाही तर पुढे जाऊन खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. घरमालक खूप अटी लादतात, ज्याचा पुढे जाऊन आपल्याला त्रास होतो. त्यामुळे घर घेण्याआधीच घरमालकाला पुढील 10 प्रश्न नक्की विचारा.

| Mar 01, 2024, 12:01 PM IST

Tips for Renting Property: घरमालक अनेक अटी लादतो ज्या तुम्हाला पूर्वी नीट समजवल्या गेल्या नव्हत्या. किंवा घरातच काही समस्या दिसू लागतात ज्याकडे तुम्ही घर भाड्याने घेताना लक्ष दिलेले नसते. हे सर्व होऊ नये म्हणून घर भाडे करार करण्याआधीच काही गोष्टी स्पष्ट करायला हव्यात.

1/11

घर भाड्याने घेण्याआधी घरमालकाला हे 10 प्रश्न नक्की विचारा!

Ask Landlord these 10 questions Before renting house

Tips for Renting Property:तुम्ही घर भाड्याने घेत असाल तर आपल्या आवडीनुसार घर मिळवणे आणि नंतर शिफ्टिंगपर्यंतची प्रक्रिया खूप कठीण असते. भाड्यानं घर घेताना वेळीच काळजी घेतली नाही तर पुढे जाऊन खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. घरमालक खूप अटी लादतात, ज्याचा पुढे जाऊन आपल्याला त्रास होतो. त्यामुळे घर घेण्याआधीच घरमालकाला पुढील 10 प्रश्न नक्की विचारा. 

2/11

भाड्यात काय समाविष्ट?

Ask Landlord these 10 questions Before renting house

घरमालकाने सांगितलेले भाडे हे फक्त घराचे भाडे असते. त्यामध्ये वीज, पाणी, पार्किंग, सुरक्षा, देखभाल याचा समावेश नसतो. तुम्हाला हे सर्व स्वतंत्रपणे भरावे लागते. त्यामुळे भाड्यात काय समाविष्ट आहे याची अगोदर खात्री करा. हे अतिरिक्त शुल्क कमी केले जावे किंवा भाड्यातच समाविष्ट केले जावे यासाठी वाटाघाटी करा.

3/11

भाडे केव्हा आणि कसे द्यायचे?

Ask Landlord these 10 questions Before renting house

तुम्ही शिफ्ट केले त्याच दिवसापासून भाडे भरायचे की महिन्याच्या विशिष्ट तारखेपासून भाडे घेणार ते विचारा. तुम्हाला भाडे कॅशने भरावे लागेल किंवा तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता का?  हे विचारण्यास विसरू नका.

4/11

सिक्युरिटी डिपॉझिटचा नियम?

Ask Landlord these 10 questions Before renting house

आता भाड्यासोबत सिक्युरिटी डिपॉझिट घेणे सर्रास झाले आहे. आता, पहिल्या महिन्याच्या भाड्यासोबत, तुम्हाला आणखी एक महिन्याचे भाडे द्यावे लागते. जे सुरक्षा ठेव किंवा आगाऊ मानले जाते. काही ठिकाणी ते एक ते तीन महिन्यांपर्यंत टिकू शकते. मालमत्तेवर तारण म्हणून ही रक्कम घेतात. तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा, घरमालक त्याच्या मूल्यांकनाच्या आधारे त्याला किती पैसे परत करायचे आहेत याची मोजणी करतो.

5/11

नोटीस कालावधी किती असेल?

Ask Landlord these 10 questions Before renting house

घर सोडण्यापूर्वी काही वेळ आधी घर सोडत आहोत हे घरमालकाला कळवावे लागेल. जेणेकरून तो त्या वेळेत तो दुसरा भाडेकरू शोधू शकेल. सहसा ते एक महिन्याचे असते. काहीवेळा ते दोन महिन्यांचे देखील असू शकते.

6/11

भाडे करार मोडल्यास?

Ask Landlord these 10 questions Before renting house

करारात ठरल्याप्रमाणे कोणतीही अट पूर्ण करू शकत नसाल तर घरमालक तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दंड ठोठावेल का? हेदेखील विचारा. करारामध्ये दंडाची रक्कम नमूद करावी.

7/11

देखभाल कोण देईल?

Ask Landlord these 10 questions Before renting house

भाड्याबरोबरच घरमालक देखभाल खर्चाची मागणी करतात. मग तुम्हाला तो खर्च वेगळा द्यावा लागेल की तुम्ही हे शुल्क भाड्यातच समाविष्ट करणार आहात? द्यायचेच असेल तर कोणाला द्यायचे, हे समजून घ्या. 

8/11

कुटुंब/पाहुणे येतात तेव्हा काय?

Ask Landlord these 10 questions Before renting house

घरात पाहुणे येऊ शकत नाहीत. किंवा जास्त काळ राहू शकत नाहीत, अशी अट काही घरमालक ठेवतात. तसेच मुली/मुलं येऊ नयेत असेही सांगतात. त्यामुळे काही दिवसांसाठी तुमच्या कुटुंबातील कोणी आले किंवा पाहुणे आले तर काही अडचण आहे का? हे आधीच विचारा.

9/11

काही निर्बंध आहेत का?

Ask Landlord these 10 questions Before renting house

अनेक घरमालक भाड्याने घर देण्यापूर्वी विविध अटी घालतात. व्हेज-नॉन-व्हेज काय खावे, पाळीव प्राणी पाळता येतील की नाही? तुम्ही पार्टी करू शकता की नाही, संगीत वाजवू शकता की नाही? हे सर्व आधीच जाणून घ्या. 

10/11

युटिलिटीजमध्ये काय आहे?

Ask Landlord these 10 questions Before renting house

घराच्या फर्निचरमध्ये काय उपलब्ध आहे. गॅस पाइपलाइन मिळेल की नाही. एलपीजी कनेक्शन कसे मिळवायचे? गीझरची सुविधा आहे की नाही? किचनमध्ये आरओ बसवला आहे की तो लावावा लागेल? पार्किंग उपलब्ध होईल की नाही आणि त्यासाठी वेगळे शुल्क भरावे लागेल का? तसेच पहिल्यांदाच शिफ्टिंग करत असाल तर घराची व्यवस्थित साफसफाई आणि पेंटिंग करुन मिळेल का? हे सर्व विचारा. 

11/11

घरमालक कुठे राहतो?

Ask Landlord these 10 questions Before renting house

तुमचा घरमालक त्याच इमारतीत राहतो का हे जरूर विचारा? यावरून तुम्हाला किती प्रायव्हसी मिळेल याची कल्पना येते. शिवाय ते ज्या पद्धतीने बोलतात त्यावरून त्यांच्या बाजूने काही ढवळाढवळ होईल की नाही हेही कळू शकते.